अन्यायी जातीय व्यवस्था हद्दपार करण्यासाठी या महामानवाने शेवटचा श्वासापर्यंत संघर्ष केला -अनिल साळवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल साळवे, सल्लागार ॲड. दीपक धीवर, खजिनदार संजय निर्मल, विजय लोंढे, प्रकाश भालेराव आदींसह संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
अनिल साळवे म्हणाले की, अस्पृश्य समाजाला सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास मिळावे म्हणून महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला. सामाजिक समता प्रस्थापित करुन त्यांनी अस्पृश्यांना जगण्याचा अधिकार मिळवून दिला. अन्यायी जातीय व्यवस्था हद्दपार करण्यासाठी या महामानवाने शेवटचा श्वासापर्यंत संघर्ष केल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. दीपक धीवर म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचाराने समाजाचा उध्दार होणार असून, त्यांचे विचार सर्वांनी अंगीकारावे. समाजाला त्यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करण्याचा संदेश दिला. त्यांची दिलेले विचार समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.