मातंग समाजाच्या प्रश्नावर असंवेदनशीलता दाखविणाऱ्या सरकारचा निषेध
पुणे ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या पायी पदयात्रेची दखल घेण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाला अ, ब, क, ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी पुणे ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या पायी पदयात्रेची तात्काळ दखल घेण्यासाठी लहुजी शक्ती सेना व मातंग समाजाच्या वतीने अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर समाजाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते अर्धनग्न होवून आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनात लहुजीशक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाठ, महिला जिल्हाध्यक्षा अनिता नेटके, शहराध्यक्ष पावलस पवार, जिल्हा संपर्कप्रमुख जयवंत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे, जिल्हा संघटक लखन साळवे, शहर संपर्क प्रमुख संतोष उमाप, सिताराम शिरसाठ, अभिजीत सकट, ज्ञानेश्वर जगधने, लक्ष्मण पठारे, सिताराम शिरसाठ, आनंदराज नेटके, रोहित लोखंडे, सुनील सकट, लक्ष्मण साळवे, सुरेश घोरपडे, रवी शिरसाठ, नवनाथ वैरागर, अक्षय वायदंडे, मनोज शिंदे, बाळासाहेब शेलार, कृष्णा गाडेकर, भानुदास ससाणे, बाळासाहेब शिरसाठ, आदिनाथ शिरसाठ, सुमन गायकवाड, पवन शिरसाठ, अजय शिरसाठ, संपत शिरसाठ, संदीप फाळके, पिंटू शिरसाठ, विठ्ठल शिरसाठ, छाया नेटके, शांताबाई नेटके, वैशाली ससाणे, लताबाई नेटके, सुनिता नेटके, मंदाबाई नेटके, हिराबाई नेटके आदी उपस्थित होते.
आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. आंदोलकांसह महिला देखील रस्त्यावर उतरल्या होत्या. नागपूर पर्यंत चालत जाताना पायातून रक्त येऊन देखील पुढील प्रवास सुरु ठेवणाऱ्या कसबे यांच्या पद यात्रेसंदर्भात असंवेदनशीलता दाखविणाऱ्या सरकारचा आंदोलकांनी यावेळी निषेध नोंदवला. रास्ता रोको मुळे अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दोन्ही बाजूने काही वेळ वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलकांचे निवेदन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी स्विकारले.
अनिता नेटके यांनी मातंग समाजातील महिला रस्त्यावर उतरल्या असून, समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे. विष्णूभाऊ कसबे यांच्या पदयात्रेची सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

सुनिल शिंदे म्हणाले की, सरकार मातंग समाजाप्रती असवेदनशीलता दाखवीत आहे. निघालेली पदयात्रा ही समाजाच्या न्याय, हक्काच्या मागणीसाठी असून, तातडीने या पदयात्रेची दखल घेऊन हा प्रश्न समोपचाराने सोडवावा. अन्यथा राज्यातील मातंग समाज पेटून उठणार आहे. तर 16 डिसेंबरला पदयात्रा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकल्यास तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी समाजातील प्रलंबीत प्रश्नांसाठी लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे गंजपेठ येथील तालीम पासून ते नागपूर पर्यंत आरक्षण क्रांती पदयात्रा काढली आहे. 1150 कि.मी. त्यांचा पायी प्रवास सुरु आहे. नागपूरच्या दिशेने पायी जाताना चालून चालून त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले आहे. समाजाला न्याय मिळावा म्हणून स्वतःचा विचार न करता ते मार्गक्रमण करत आहे. परंतू शासनाने या पययात्रेची दखल न घेता असंवेदनशीलता दाखवली असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले.
अनुसूचित जातीला एकत्रित 13 टक्के आरक्षण असून, अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करावी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत समावेश करावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ बंद पडल्याने समाजातील युवकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले असताना हे महामंडळाला भरीव आर्थिक तरतूद करून पुन्हा सुरु करावे या प्रमुख मागण्या घेऊन नागपुरच्या हिवाळी अधिवेशनवर लहूजी शक्ती सेनेची पदयात्रा निघालेली आहे.