विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी प्रीथीज पाठशाळेचा उपक्रम
तोंडी व लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी प्रीथीज पाठशाळेच्या वतीने शहरात स्पेल ओ वेल या आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इंग्रजी भाषेतील विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह व त्याचे योग्य स्पेलिंग अवगत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
भोसले आखाडा, साईनगर येथील किड्स जी स्कूलमध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन वैशाली चोपडा यांच्या हस्ते झाले. प्रीथीज पाठशाळेच्या संस्थापिका प्रीती मुथियान यांनी लहान वयातच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना सामोरे जाण्याची सवय होण्यासाठी व इंग्रजीतील स्पेलिंगची योग्य माहिती होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. सह संस्थापक चेतन मुथियान यांनी उपस्थित पाहुणे व पालकांचे स्वागत केले.

या स्पर्धेत शहर व उपनगरातील इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला. तोंडी व लेखी पध्दतीने पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दीमत्तेची चुणूक दाखवली. चार गटात ही स्पर्धा पार पडली. याचे परीक्षण वासंती तिरमल, भावना शिंगवी, शैलेजा लढ्ढा, प्रिया चोपडा, आर. सुमित्रा यांनी केले.
स्पर्धेसाठी सचिन कानडे, राजेश भंडारी, दर्शना बोगावत, प्रमोद गांधी यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेत युकेजी गटात- परीक्षीत यादव, इशान बच्चावत, प्रारब्धी मंत्री, इयत्ता पहिली गट- लविशा लुणिया, भव्या संचेती, मिवान कासवा, इयत्ता तिसरी व चौथी गट- रिया धानोरकर, मयंक पितळे, अर्चित क्षीरसागर यांनी बक्षिसे पटकाविली.
स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व फन की लॅण्डचे मोफत प्रवेशिका देण्यात आल्या. तर स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र फन की लॅण्डचे डस्काउंट कुपन देण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रीना मुनोत, शितल मुनोत, सोनिया घंगाळे, राधिका पटवारी, अनिता गंभीर, विनी तलरेजा, संगीता कटारिया, प्राची भंडारी, सोनम खिलारी, सोनाली गर्जे व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.