अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले, भिंगार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय सपकाळ, कलिम शेख, सुरेश मेहतानी, शिवम भंडारी, मतीन ठाकरे, मुसा सय्यद, सिध्दार्थ आढाव, दिपक दिपाने आदी उपस्थित होते. आमदार जगताप यांनी प्रशांत गायकवाड यांच्या निवडीचे स्वागत करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.