तोंडाला काळे पट्टया बांधून असंवेदनशीलता दाखविणाऱ्या सरकारचा निषेध
पुणे ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या पायी पदयात्रेला पाठिंबा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मातंग समाजाला अ, ब, क, ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी पुणे ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या पायी पदयात्रेच्या पार्श्बभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
नागपूर पर्यंत चालत जाताना पायातून रक्त येऊन देखील पुढील प्रवास सुरु ठेवणाऱ्या कसबे यांच्या पद यात्रेसंदर्भात असंवेदनशीलता दाखविणाऱ्या सरकारचा आंदोलकांनी तोंडाला काळे पट्टया बांधून निषेध नोंदवला. या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाठ, महिला जिल्हाध्यक्षा अनिता नेटके, शहराध्यक्ष पावलस पवार, जिल्हा संपर्कप्रमुख जयवंत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे, जिल्हा संघटक लखन साळवे, शहर संपर्क प्रमुख संतोष उमाप, तालुका उपाध्यक्ष सिताराम शिरसाठ, अभिजीत सकट, ज्ञानेश्वर जगधने, लक्ष्मण पेठारे, सिताराम शिरसाठ, आनंदराज नेटके, रोहित लोखंडे, छाया नेटके, काजल ससाणे, शांताबाई नेटके, वैशाली ससाणे, लताबाई नेटके, सुनिता नेटके, मनीषा नेटके, मंदाबाई नेटके, हिराबाई नेटके आदी सहभागी झाले होते.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी समाजातील प्रलंबीत प्रश्नांसाठी लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुणे गंजपेठ येथील तालीम पासून ते नागपूर पर्यंत आरक्षण क्रांती पदयात्रा काढली आहे. 1150 कि.मी. त्यांचा पायी प्रवास आहे. नागपूरच्या दिशेने पायी जाताना चालून चालून त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले आहे. समाजाला न्याय मिळावा म्हणून स्वतःचा विचार न करता ते मार्गक्रमण करत आहे. परंतू शासनाने या पययात्रेची दखल न घेता असंवेदनशीलता दाखवली असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले.
तर अनुसूचित जातीला एकत्रित 13 टक्के आरक्षण असून, अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करावी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत समावेश करावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ बंद पडल्याने समाजातील युवकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले असताना हे महामंडळाला भरीव आर्थिक तरतूद करून पुन्हा सुरु करावे या प्रमुख मागण्या घेऊन नागपुरच्या हिवाळी अधिवेशनवर निघालेल्या पदयात्रेच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पययात्रेची सरकारने दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यात मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी दिला आहे.