स्पर्धेत टिकण्यासाठी फोरजी व फाईव्हजीची सेवा सुरु करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बीएसएनएलला फोरजी व फाईव्हजीची सेवा तातडीने सुरु करण्यासह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी शहरातील जीपीओ चौकात मानवी साखळी करुन जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध व्यक्त करुन घोषणाबाजी करण्यात आली.
बीएसएनएलईयू, एनएफटीई बीएसएनएल, एआयबीडीपीए व सीसीडब्ल्यूएफ संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे जिल्हा सचिव कॉ. विजय शिपणकर, अध्यक्ष कॉ. आप्पासाहेब गागरे, कॉ. शंकर चेडे, कॉ. रमेश शिंदे, कॉ. मंडलिक, कॉ. कोकरे, संतोष शिंदे, कॉ. सुनिल ससाणे, कॉ. अनिल क्षीरसागर, कॉ. प्रशांत अष्टेकर, बाबुजी मखरे, कॉ. एस.बी. मोहिते, कॉ. अर्जुन वाळके, कॉ. टिमकरे, कॉ. शिंदे, कॉ. नारायण गाडेकर, कॉ. शिला झेंडे, कॉ. आयशा शेख, कॉ. गौरी बडवे, कॉ. शारदा मलटे आदींसह बीएसएनएल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्कल सीएचक्यूच्या आदेशानुसार देशभर बीएसएनएल कर्मचारी यांनी आंदोलन केले. शहरातील बीएसएनएल जीएम कार्यालय येथे आंदोलनाला प्रारंभ झाले. कर्मचारी आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन जीपीओ चौकात निदर्शने केली. कॉ. आप्पासाहेब गागरे म्हणाले की, बीएसएनएल कर्मचारी न्याय, हक्काच्या मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे बीएसएनएल डबघाईला आले आहे. कर्मचारी वर्गावर एकप्रकारे अन्याय सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. विजय शिपणकर यांनी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून, हे मागण्या मान्य न झाल्यास देशभरात तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा तिसरा वेतन करार करावा व नॉन एक्झिक्युटिव्ह कर्मचारी यांना नविन प्रमोशन पॉलिसी लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.