• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

एच.डी.एफ.सी.च्या भिंगार शाखेचा शुभारंभ

ByMirror

Nov 25, 2023

बँकेची नवीन शाखा नागरिकांसह उद्योग-व्यवसायिकांना फायद्याची ठरणार -जनक आहुजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारला एच.डी.एफ.सी. बँकेच्या नूतन शाखेचा शुभारंभ उद्योजक जनक आहुजा यांच्या हस्ते झाला. यावेळी एच.डी.एफ.सी. बँक अहमदनगरचे क्लस्टर हेड रोनक शाह, भिंगार शाखेचे शाखाधिकारी सचिन मानकर, सावेडी शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र बिलावर, पाईपलाईन रोड शाखेचे शाखाधिकारी संदीपसिंग परदेशी, नागापूर शाखेचे शाखाधिकारी प्रमोदकुमार उपस्थित होते.


जनक आहुजा म्हणाले की, शहराला लागून असलेल्या भिंगार शहराचा छपाट्याने विकास झाला आहे. येथे स्वतंत्रपणे बाजारपेठ विकसीत झाली असून, उद्योग-व्यवसाय क्षेत्र देखील विकसीत होत आहे.

भिंगारकरांच्या सोयीसाठी एच.डी.एफ.सी. बँकेने सुरु केलेली शाखा सर्वसामान्य नागरिकांसह उद्योग-व्यवसायिकांना फायद्याची ठरणार आहे. तर उद्योग-व्यवसाय वाढीसाठी महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.


भिंगार शाखेचे शाखाधिकारी सचिन मानकर यांनी मराठवाडा विभागातील 104 क्रमांकाची भिंगार शाखेचा शुभारंभ नागरिकांच्या सोयीसाठी प्रारंभ करण्यात आला आहे. एच.डी.एफ.सी. बँक ही देशातील वेगाने विस्तारित होणारी अग्रगण्य बँक असल्याचे सांगितले. तर विजय चौक, जतीन हाईट्स मध्ये सुरु झालेल्या एच.डी.एफ.सी. च्या भिंगार शाखेत सर्व सुविधा उपलब्ध असून, आकर्षक व्याजदरात मुदत ठेव, सोने तारण व इतर सर्व लोन सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *