अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शारदा प्रभाकर केळगंद्रे यांचे गुरुवारी (दि.23 नोव्हेंबर) निधन झाले. त्या 69 वर्षाच्या होत्या. सरकारी वकील ॲड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांच्या मातोश्री तर पत्रकार विठ्ठल शिंदे यांच्या त्या सासूबाई होत्या.
त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांचा अंत्यविधी नालेगाव अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.