मेकअप कार्यशाळेला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सौंदर्य खुलविण्याचे देण्यात आले धडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी दिवाळीनिमित्त अहिल्या फाउंडेशन, नयन्स आणि अहिल्या मेकओव्हरच्या वतीने मोफत सेल्फ मेकअप सेमिनार घेण्यात आले. सावेडी येथे झालेल्या या कार्यशाळेला महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नयन सोनवणे यांनी महिलांनी स्वत:चे मेकअप स्वत: कसे करावे? याबद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. नयन सोनवणे यांनी स्वतःचा मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? कोणते साहित्य कधी आणि कसे वापरावे याबद्दल मार्गदर्शन केले. दीक्षा इंगोले यांनी मेकअपचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट कावेरी कैदके यांनी ऍडव्हान्स वॅक्सचे प्रात्यक्षिक दाखवून महिलांना पार्लर क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत असून, युवतींना सौंदर्य अधिक चांगल्या पध्दतीने खुलविण्याची माहिती दिली.