• Sun. Jul 20th, 2025

दिवाळी पाडव्यानिमित्त ग्राहकांची इलाक्षी ह्युंदाईला प्रथम पसंती

ByMirror

Oct 28, 2023

बुकिंगला ग्राहकांचा प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर ह्युंदाईच्या विविध मॉडेल्स कारला ग्राहकांची प्रथम पसंती मिळत आहे. शहरातील नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये बुकिंगला आत्तापासूनच प्रतिसाद सुरु झाला आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही ग्राहक ह्युंदाईला पसंती दर्शवीत आहे.


कुटुंबाच्या सुरक्षित प्रवासासाठी खाजगी वाहनाला पसंती मिळत आहे. ह्युंदाईची नावाजलेली ब्रॅण्ड इमेज विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी विविध दर्जेदार उत्पादने वाहन क्षेत्रातील सर्वोच्च वॉरंटी, कमीत कमी मेंटेनन्स, सुरक्षेसाठी सर्व मॉडेलला सहा एअरबॅग तसेच इलाक्षी ह्युंदाईची विनम्र तत्पर सेवा यामुळे ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.


ग्राहकांची हुंडाई क्रेटा, अल्काझार, आय ट्वेंटी, वर्णा साठी प्रथम पसंती असून, नवरा आणि औरा ॲण्ड नियोसे, एक्स्टरची कमालीची बुकिंग येत आहे. सदरील गाड्यांमध्ये डिझेल, पेट्रोल व सीएनजी वेरंट उपलब्ध असून, डिझेल दीड लिटर व पेट्रोल 1.2 लिटर व दीड लिटर इंजन मध्ये उपलब्ध आहेत. औरा, नियोसे, एक्स्टर मध्ये पेट्रोल व सीएनजी पर्याय उपलब्ध आहेत.

द ऑल न्यू क्रेटा व एक्सटर वर्णासाठी प्रचंड प्रतीक्षा यादी असून सुद्धा ग्राहकांची बुकिंग साठी प्रतिसाद वाढत आहे. शोरुममध्ये ग्राहकांसाठी आकर्षक सवलत स्कीम, एक्सचेंजची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांचा उदंड प्रतिसाद पाहता त्यांची निराशा टाळण्यासाठी ग्राहकांना दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गाडी मिळण्यासाठी व प्री बुकिंग करण्यासाठी इलाक्षी ह्युंदाईला भेट देण्याचे आवाहन शोरुमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *