ह्युंदाईच्या 90 कार्सचे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- विजया दशमीच्या (दसरा) मुहूर्तावर शहराच्या नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरुमला आकर्षक सजावट करण्यात आली होती.
ग्राहकाचे सुहास्य वदनाने होणारे स्वागत, कर्मचाऱ्यांची विनम्र आणि तत्पर सेवा, सुमधूर संगीत, गाडी वितरणवेळी अभिनंदन गीत अशा उत्साहपूर्ण वातावरणाने शोरुमचा परिसर गजबजला होता. ह्युंदाईच्या विविध मॉडेल्सच्या सुमारे 90 कार्सचे वितरण करण्यात आले. ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादबद्दल शोरुमचे संचालक विजयकुमार गडाख यांनी ग्राहकांचे आभार मानले व विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या .
अनेक ग्राहकांनी मिळालेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केल. ग्राहकांना उत्कृष्ट व दर्जेदार सेवा देण्यास इलाक्षी ह्युंदाई बांधील असल्याचा विश्वास मॅनेजर राजू बेजगमवर यांनी व्यक्त केला.
प्रथम गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना चालक सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्राहकांना घरपोच डिलिव्हरी सेवा तसेच अतिरिक्त वॉरंटी, ह्युंदाई ॲपसह ग्राहकांना विविध सुविधांचा लाभ देण्यात आला.