• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात शनिवारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी नगर तालुकास्तरीय निवड चाचणी

ByMirror

Oct 2, 2023

तालुक्यातील कुस्तीपटूंना सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे शनिवारी (दि.7 ऑक्टोबर) वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023 स्पर्धेसाठी नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


गावातील बिरोबा मंदिर येथील कुस्ती आखाड्यात होणाऱ्या निवड चाचणीला नगर तालुक्यातील कुस्तीपटूंना सहभागी होण्याचे आवाहन नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, कार्याध्यक्ष ॲड. अभिषेक भगत, उपाध्यक्ष काशिनाथ पळसकर, सचिव बाळू भापकर, सहसचिव सुभाष नरवडे, खजिनदार किसन वाबळे, उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार, नगर तालुका कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष धोंडीभाऊ जाधव, सचिव पै. संदीप डोंगरे यांनी केले आहे.


या स्पर्धेचे शुभारंभ जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेच्या दिवशी सकाळी आठ ते दहा या वेळेत वजनासाठी मल्लांनी उपस्थित रहावे. वजनानंतर कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पंच म्हणून एनआयएस कुस्ती कोच गणेश जाधव व प्रियंका डोंगरे काम पाहणार आहे. निवड चाचणी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी 86 ते 125 किलो वजन गटात (गादी व माती) होणार आहे. तालुकास्तरावर निवड झालेल्या मल्लांना जिल्हा निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धेला येताना खेळाडूंनी खेळाडूंनी पासपोर्ट फोटो व आधारकार्ड सोबत आनणे आवश्‍यक आहे. अधिक माहितीसाठी पै. नाना डोंगरे 9226735346 यांना सपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *