नाशिक येथे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल झाला सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कला शिक्षिका गीतांजली रोहित लाहोर-लोटके यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथे कलाकुंज शिक्षक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
नाशिक येथील रविवार पेठ, कालिदास कला मंदिरात कलाकुंज सन्मान सोहळा रंगला होता. यामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, महेंद्र देशपांडे, डॉ. प्रसन्न मुळये, अभिनेत्री स्मिता प्रभू, उद्योजक जयंत जोगळेकर, प्राचार्य डॉ. राजश्री देशपांडे, सुनील पाटील आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये गीतांजली लाहोर-लोटके यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गीतांजली लाहोर-लोटके या शहरात गीत ड्राँईग क्लासेसच्या संचालिका तर नगर-सोलापूर रोड येथील नालंदा स्कूलमध्ये कला शिक्षिका आहेत. त्या विद्यार्थ्यांना कला शिक्षणाचे धडे देत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्या दरवर्षी विविध उपक्रम राबवित असतात. कलेची आवड असलेल्या व विद्यार्थ्यांमधून उत्तम कलाकार घडविण्यासाठी त्या सातत्याने कार्य करत आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील उपक्रमांची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
