• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील खेळाडूची आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

ByMirror

Sep 6, 2023

दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत भारतात पहिल्या येण्याचा पटकाविला बहुमान

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खेळाडू स्केटिंग कार्तिक रत्नेश मिश्रा या दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. मिश्रा याने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 21 वर्ष वयोगटात भारतात पहिल्या येण्याचा बहुमान पटकाविला असून, त्याची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


नुकतीच दिल्ली येथे स्कूल गेम ॲण्ड ॲक्टिव्हिटी डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये देशभरातून खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत नगरचा खेळाडू कार्तिक मिश्रा याने आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली. 20 सप्टेंबर पासून नेपाळ मध्ये होणाऱ्या स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.


मिश्रा हा शहरातील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल व पॉलीटेक्निकचा माजी विद्यार्थी आहे. स्केटिंगचे दिवंगत प्रशिक्षक मनोज करपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्केटिंगचे धडे गिरवले आहे. सध्या तो स्वत: सराव करत असून, भारती विद्यापीठ पुणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *