• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

बसपाच्या महिला शहराध्यक्षपदी अंजुम सय्यद व विधानसभा प्रभारीपदी गणेश बागल यांची नियुक्ती

ByMirror

Aug 21, 2023

बसपा बहुजन समाजात नेतृत्व विकसित करुन, उपेक्षितांचे प्रश्‍न सोडवित आहे -उमाशंकर यादव

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य करत आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. बहुजन समाजात नेतृत्व विकसित करुन, उपेक्षितांचे प्रश्‍न सोडवित आहे. उत्तमप्रकारे संघटन करुन जिल्ह्यात बसपा एक प्रबळ पक्ष म्हणून पुढे आला असल्याचे प्रतिपादन बसपाचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी केले.


बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत महिला शहराध्यक्षपदी अंजुम सय्यद व विधानसभा प्रभारीपदी गणेश बागल यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यादव बोलत होते. यावेळी बसपाचे शहराध्यक्ष फिरोज शेख (पत्रेवाला), शहर उपाध्यक्ष रवीनंद कुमार, अन्वर शेख, सलिम शेख, अमिर खान, बशीर कादर, उमेश बागुल, शशिकांत वालेकर, रामचंद्र पवार, रजीया शेख आदी उपस्थित होते.
पुढे यादव म्हणाले की, गल्ली पासून दिल्ली पर्यंत भ्रष्टाचार व जातीयवादाने देश पोखरला जात आहे. शेतकरी, युवक व कामगारांच्या प्रश्‍नापेक्षा जातीयवादी मुद्दे उपस्थित करुन सर्व प्रश्‍नांना बगल दिली जात आहे. मात्र बसपा जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देता, समाजातील प्रश्‍न जनतेपुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर भविष्यातील निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून उत्तमप्रकारे संघटन सुरु असल्याची माहिती दिली.


शहराध्यक्ष फिरोज शेख यांनी बहुजन समाज पार्टी दीन-दुबळ्यांच्या सेवेसाठी कार्य करत आहे. जातीयवादी व भ्रष्टाचारी पक्षांना बसपा सक्षम पर्याय आहे. पक्षाचे विचार व ध्येय-धोरण जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. सर्वजन हिताय, या भावनेने प्रत्येक कार्यकर्ता काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नुतन पदाधिकारी अंजुम सय्यद यांनी महिलांचे प्रश्‍न गंभीर बनत चालले आहे. तर अल्पसंख्यांक महिलांच्या प्रश्‍नावर दुर्लक्ष होत असताना याकडे विशेष लक्ष देवून कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश बागल यांनी सेक्टर बुथ निर्माण करुन पक्ष वाढीला चालना दिले जाणार असल्याचे सांगितले. दोन्ही नुतन पदाधिकाऱ्यांचे राज्य व जिल्ह्यातील बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *