केसांचे सौंदर्य खुलविण्यासाठी महिलांना मोफत प्रशिक्षण
कौशल्य प्रशिक्षणातून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत आहे -कावेरी कैदके
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी सध्या केसांसाठी ट्रेंडिंग असलेल्या हेअर केमिकलचे मोफत प्रशिक्षण वर्ग अहिल्या फाउंडेशन, अहिल्या मेक ओव्हर आणि साखला कॉस्मेटिक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. या प्रशिक्षण वर्गाला शहरातील महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पुणे येथील कुलटॉक्स हेअर प्रोफेशनलच्या नयन पुजारी यांनी या प्रशिक्षण वर्गात हेअर केमिकल संदर्भात मार्गदर्शन केले. केसांसाठी असलेल्या बुटॉक्स, केराटिनची प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कावेरी कैदके, सुवर्णा कैदके, जयश्री मॅडम, ऋषिकेश दातीर, वैष्णवी म्हेस, भावना पोहेकर, वैष्णवी भुसे, साक्षी पवार, श्रद्धा दुतारे, आरती प्रभुणे आदींसह महिला व युवती उपस्थित होत्या. या प्रशिक्षण वर्गात जिल्हाभरातील महिला ब्युटीशियन यांनी देखील सहभाग नोंदवला होता.

कावेरी कैदके म्हणाल्या की, पार्लर क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत असून, युवतींना सौंदर्य अधिक चांगल्या पध्दतीने खुलविण्याची व त्यामध्ये करिअर करण्याची संधी निर्माण झाली आहे. कौशल्य प्रशिक्षणातून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत असून, सौंदर्यशास्त्राच्या शाखा विस्तारल्या गेल्या आहेत. यामध्ये अनेक अत्याधुनिक पद्धतीचा प्रशिक्षण घेऊन कौशल्य आत्मसात करण्याचे त्यांनी आवाहन केले.