• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

सर्पमित्र युसूफ खान यांनी अजगरला मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून वाचवून निसर्गात केले मुक्त

ByMirror

Aug 10, 2023

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सिना नदी लगत असलेल्या काटवन खंडोबा परिसरात मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून 10 फुटी महाकाय अजगरला (इंडियन रॉक पायथन) सोडवून सर्पमित्र युसूफ बशीर खान यांनी जीवदान दिले. तर सदर अजगरला पकडून निसर्गात मुक्त केले.


काटवन खंडोबा परिसरात मोकाट कुत्र्यांच्या टोळीने अजगरला घेराव घालून मोठ-मोठ्याने भुंकण्यास सुरुवात केली होती. स्थानिक नागरिकांनी परिस्थिती पाहून अजगरला वाचविण्यासाठी सर्पमित्र युसूफ खान यांना संपर्क साधला. त्यांनी तातडीने येवून मोकाट कुत्र्यांना हाकलून लावले तर अजगरला मोठ्या कौशल्याने पकडले. भलामोठा अजगर पाहून उपस्थितांच्या मनात धडकी भरली होती. तर अजगर पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. सदर अजगरला सर्पमित्र युसूफ खान व अली खान यांनी निसर्गात मुक्त केले.


सध्या एमआयडीसी ते रेल्वे स्टेशन पर्यंत सिना पात्राच्या परिसरात घोणस व अजगर आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे बिलात पाणी जावून तर नदीच्या प्रवाहाबरोबर ते वाहून येत आहे. नागरिकांनी कोठेही अजगर व सर्प आढळल्यास त्यांना मारू नये, त्यासाठी मो.नं. 9422238885 व 7083857633 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन खान यांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *