शहरात आप मध्ये कार्यकर्त्यांची इनकमिंग जोमाने सुरु -भरत खाकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीसह नुकतेच पंजाब काबीज करणार्या आम आदमी पार्टीला अहमदनगर शहरातही सध्या चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतेच आम आदमी पार्टीत माहिती अधिकार कार्यकर्ते गौतम कुलकर्णी, विक्रम क्षीरसागर व दीपक नगरकर यांच्यासह शहरातील दिल्लीगेट व केडगाव परिसरातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
नुकतीच शहरात आम आदमी पार्टीची बैठक पार पडली. यामध्ये कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. पक्षाची विचारधारेने प्रेरित होऊन कार्यकार्त्यांना आप मध्ये प्रवेश केला. सर्वांना टोपी व गुलाबपुष्प देऊन पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष मेजर भरत खाकाळ, शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कर्डिले, सहसंयोजक संपत मोरे, सचिव दिलीप घुले, रवी सातपुते, प्रकाश फराटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भरत खाकाळ म्हणाले की, महाराष्ट्र सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांचे भ्रष्टाचार उघडकीस आनत असून, विकास व युवकांच्या रोजगारावर बोलण्यास तयार नाही. आप पक्ष सर्वसामान्यांच्या हितासाठी व भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था आनण्यासाठी प्रयत्नशील आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करुन आम आदमी पार्टी सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकार चालवित असून, ही ध्येय-धोरण घेऊन शहरात कार्य सुरु असल्याने कार्यकर्त्यांची इनकमिंग जोमाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. अशोक डोंगरे म्हणाले की, आम आदमी पक्षाने सर्वसामान्य मनुष्य केंद्रबिंदू ठेऊन दिल्लीत आपली सरकार चालवत आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणांना सर्वसामान्य जनता प्रभावित होत असल्याने पंजाबमध्ये मोठा बदल आपने घडवून दाखविला आहे. देश सेवा या भावनेने आपचे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता योगदान देत आहे. अहमदनगरमध्ये देखील आपचे कार्य जोमाने सुरु असून, युवा वर्ग पक्षाशी जोडला जात असल्याचे त्यांनी सांगितले.