• Wed. Jul 23rd, 2025

नथीचा नखरा विविध डिझाईन्सच्या ट्रेंड्स मध्ये

ByMirror

Jul 25, 2023

महाराष्ट्रीयन नथ बनविण्याच्या कार्यशाळेला महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर (प्रतिनिधी)- सौंदर्यामध्ये भर घालणारा नथ हा दागिना असून, महिलांची महाराष्ट्रीयन वेशभुषा नथीशिवाय पूर्ण होत नाही. सध्या विविध प्रकारच्या नथीचे डिझाईन्सचे ट्रेंड्स सुरु असताना शहरात महाराष्ट्रीयन नथ बनविण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


अगदी पूर्वपरंपरागत नऊवारी साडी आणि त्यावर सोन्यात मढलेली मोत्याची नथ हे कॉम्बिनेशन असायचे. पण आता अनेक डिझाईन्समध्ये नथी दिसून येतात. गेल्या काही वर्षांमध्ये नथीचे डिझाईन्सही बदलले असताना, पतीच्या नावाची असलेली नथ घालण्यास महिला वर्ग विशेष प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्रीयन नथचे रुप व डिझाईन बदलत असताना प्रियंका आगरकर यांनी महिलांना विविध प्रकारात व नावाची नथ बनविण्याचे प्रशिक्षण कार्यशाळेत दिले.


बाजीराव मस्तानी चित्रपटानंतर नथीच्या डिझाईन्सना महिला वर्गात जोरदार मागणी आहे. सुंदर चेहऱ्यावर भरगच्च नथ त्यावर मोती आणि खड्याचे कोंदण, अर्धगोल आकाराची नथ मोत्यांची गुंफण, नथीच्या भागावर खडा अथवा मोराचे डिझाईन आदी विविध प्रकारात नथ बनविण्याचे महिलांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. हातमपुरा चौक येथील मेकअप आर्टिस्ट संकेत शिंदे यांच्या स्टुडिओमध्ये ही कार्यशाळा संपन्न पार पडली.


पारंपारिक पेहराव करताना नथ ही महत्त्वाची ठरते. सुंदर नथने चेहरा अत्यंत भरगच्च अधिक आकर्षक आणि लक्षवेधी दिसतो. लग्न, सण, समारंभात लेटेस्ट नथचा ट्रेंड सुरु असून, महिलांकडून वेगवेगळ्या नथची मागणी वाढत असल्याचे प्रशिक्षिका प्रियंका आगरकर यांनी सांगितले.


मेकअप आर्टिस्ट संकेत शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रीयन लग्नात नथशिवाय मेकअप पूर्ण होत नाही. नथीचा नखरा हा प्रत्येक महिलेला साजेसा दिसतो. नथने चेहरा खुलून दिसतो व महिलेला एक वेगळी सुंदरता प्राप्त होत असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *