भावी पिढीच्या भवितव्यासाठी मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज -बाळासाहेब केदारे
अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील संत रविदास महाराज यांच्या मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब केदारे यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राजेंद्र बुंदेले, संतोष उदमले, कैलास गांगर्डे, पोपट बोरुडे, अश्रू लोकरे मेजर, सुभाष भागवत, आप्पासाहेब केदारे, प्रवीण केदारे, बाळासाहेब केदारे, आजिनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
बाळासाहेब केदारे म्हणाले की, भावी पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज आहे. निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाच्या अंगणात झाडे फुलली पाहिजे. समाजसेवेला वृक्षरोपणाची जोड मिळाल्यास पर्यावरण संवर्धन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी साळवे यांनी मनुष्याचे अस्तित्व पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत असताना, वेळीच जागृक होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करुन या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.