दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी
पारनेरचे 31 विद्यार्थी ठरले चॅम्पियन
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- 24 वी नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धा पारनेरमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेला जिल्ह्यासह राज्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी काही मिनीटातच बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकारचा समावेश असलेल्या अवघड गणिती प्रक्रियाचे प्रश्न सोडवले.
विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने व त्यांच्या बुध्दीला चालना देण्यासाठी एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
झटपट गणिती प्रक्रिया सोडविण्याची स्पर्धा रंगली होती. काही तासांच्या प्रतीक्षेनंतर विद्यार्थ्यांना स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. अत्यंत कमी वेळेत सर्वाधिक गणित सोडविणारे विद्यार्थी यामध्ये विजेते ठरले. या स्पर्धेप्रसंगी एवरेस्ट अबॅकस अकॅडमीचे अध्यक्ष अभय कारले, घडेकर सर, सहाय्यक निबंधक गणेशजी औटी, पारनेर तालुका आरोग्य अधिकारी (पंचायत समिती) डॉ. स्नेहल गवारे, गुरुमाऊली पोदार लर्निंग स्कूलचे अध्यक्ष रामराव गाडेकर, सचिव मच्छिंद्र मते, माऊली शिक्षण संस्थेच्या संस्थापिका मोनाली पठारे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. अमोल बागुल आदी उपस्थित होते.

24 व्या नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत पारनेर तालुक्यातील 31 विद्यार्थी चॅम्पियन व 320 विद्यार्थी टॉप टेनचे मानांकन प्राप्त करुन आपली गुणवत्ता सिध्द केली. सार्थक संतोष गवळी व तन्वी संजय पवार या विद्यार्थ्यांना मास्टर अबॅकसचा सन्मानाने गौरव करण्यात आला. सौ. सुवर्णा ठोकळ यांना गॅलेक्सी अवार्ड देऊन गौरविण्यात आले. तर कळमकर मॅडम यांना तिसऱ्यादा स्टार टीचर्स अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले.
अबॅकस हा विषय फक्त उच्चवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिकत असायचे, परंतु वाढती स्पर्धा व स्पर्धेत टिकण्यासाठी अबॅकस मुलांना चालना देत आहे. एवरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अबॅकसचे ज्ञान उपलब्ध करुन दिले जात आहे. अकॅडमीच्या मार्गदर्शक शिक्षिका घडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा पुजारी, रेश्मा कळमकर, सुवर्णा ठोकळ, संतोष जाधव, दीप्ती ठुबे, जयश्री पठारे, कलिका गांडाळ, विद्या पवळे, पुनम मुथा, पूजा व्यवहारे , प्रणिता पाटील, सुजाता राऊत, भारती भोसले,अपेक्षा साठे, विद्यार्थ्यांना अबॅकसचे धडे देत आहे. अबॅकसमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळून ते विद्यार्थी इतर परीक्षेतही चमकत असल्याची माहिती अभय कारले यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार लोंढे सर यांनी मानले.