• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

सैनिक समाज पार्टीचा मिरी येथे रास्ता रोको

ByMirror

Oct 16, 2022

घोडेगाव मार्गे खतवाडी जुनी चारी कार्यान्वीत करण्याची मागणी

पाण्याचा वनवास कायमचा संपण्यासाठी शेतकरी वर्ग आक्रमक

अहमदनगर (प्रतिनिधी)- घोडेगाव मार्गे खतवाडी जुनी चारी कार्यान्वीत करण्याच्या मागणीसाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने स्थानिक शेतकर्‍यांसह मिरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सैनिक समाज पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे, जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, दीपक वर्मा, गोरख गडाख, अण्णासाहेब शिंदे, संतोष शिंदे, माजी सरपंच संजय गोरे, गुंड पाटील, कारभारी गवळी, आदिनाथ कराळे, मिरपगार, माणिक कोरडे, माऊली कराळे, कैलास वाबळे, नवल पाटील, भागुजी गवळी, डॉ. नंदकुमार नरसाळे, मेजर अशोक गोरे, सोमनाथ जाधव, संतोष शिंदे आदींसह परिसरातील शेतकरी बांधव सहभागी झाले होते.


मिरी पंचक्रोशीतील पाण्याचा वनवास कायमचा संपण्यासाठी सदरील जुनी चारी कार्यान्वीत होण्यासाठी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. मुळा पाटबंधारे विभागाचे उप अभियंता शरदराव कांबळे व कालवा निरीक्षक पांडुरंग गरगडे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्विकारले. या प्रश्‍नासंदर्भात त्यांनी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला. तर येत्या पंधरा दिवसात यासंदर्भात कारवाई न झाल्यास पुन्हा करंजी येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षापासून खतवाडीच्या जुनी चारीचा प्रश्‍न गाजतोय. हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न सुटत नसल्याने शेतकर्‍यांना पाण्यासाठी जीवन जगणे कठीण झाले आहे. पाथर्डी तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. या परिसरातील नागरिकांचे हाल अपेष्टा संपलेल्या नसून, शासन-प्रशासनाचे या ज्वलंत विषयाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील धरणाजवळ 60 कि.मी. असणारे गाव विकासाचा अभाव व राजकारणामुळे पाण्याचा वनवास भोगावा लागत आहे. 600 कि.मी. पर्यंत असलेल्या गावांना धरणाचा लाभ होऊन ती गावे सुजलाम-सुफलाम बनली आहे. मात्र धरणा जवळच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न देखील सुटलेला नसल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे.


हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारने बंदिस्त पाईपलाईन दिली, ती मात्र असून नसल्या सारखी नावापुरतीच राहिली आहे. ही जलवाहिनी ना दुरुस्त असून, खर्चाचे आकडे मोठ-मोठे झालेले आहे. शेतकर्‍यांना याचा उपयोग नसून, जुनी चारी आणण्यासाठी हा लढा आनखी तीव्र केला जाणार असल्याचे रावसाहेब काळे यांनी सांगितले. घोडेगाव खतवाडी मार्गे जुनी चारी प्रकल्प लवकरात लवकर मंजूर करून शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी सैनिक समाज पार्टीने केली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *