विकासकामांचा आराखडा तयार करुन शिंदे यांनी केली होती निधीची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कोटीचा निधी मंजूर केला असून, लवकरच या निधीचे पत्र अहमदनगर महापालिकेला प्राप्त होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी दिली.
शहरातील प्रलंबित विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी विशेष प्रयत्न करुन निधीसाठी पाठपुरावा केला होता. शहरातील विविध विकासकामांचा तयार केलेला आराखडा राज्य सरकारकडे सादर करुन त्यांनी निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी या पाठपुराव्याची दखल घेऊन शहराच्या विकासकामासाठी 10 कोटी रुपयाचे निधी मंजूर केले आहे.
प्रभाक क्रमांक 5, 7, 12, 13 व 16 साठी प्रत्येकी 1 कोटी, प्रभाग क्रमांक 10 साठी 2 कोटी तर प्रभाग 15 साठी 3 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डीसाठी संयुक्तपणे 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. शहर व जिल्ह्यासाठी एकूण 12 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीद्वारे प्रलंबीत विकास कामे मार्गी लावली जाणार असल्याचे अनिल शिंदे यांनी म्हंटले आहे.