• Sat. Mar 15th, 2025

लायन्सच्या बैठकीत सामाजिक उपक्रमाने खर्‍या गरजूं पर्यंत मदत घेऊन जाण्याचा निर्धार

ByMirror

Jul 9, 2023

शहरात सेवाभावाने एकत्र आलेल्यांची मोठी सामाजिक चळवळ उभी राहिली -धनंजय भंडारे

सेवा कार्यातील डॉक्टर्स, सीए व इंजीनियर यांचा सत्कार

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लबच्या माध्यमातून शहरात भरीव समाज कार्य उभे करुन खर्‍या गरजूंपर्यंत मदत घेऊन जाण्याचा निर्धार लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे नूतन अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी व्यक्त केला. तर सर्व क्लबच्या सदस्यांकडून वर्षभरात राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रमाची संकल्पना जाणून घेतली.


लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या नूतन पदाधिकार्‍यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी भंडारे बोलत होते. याप्रसंगी सचिव दिलीप कुलकर्णी, खजिनदार नितीन मुनोत, पुरुषोत्तम झंवर, प्रिती मुनोत, प्रिया बोरा आदींसह लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे भंडारे म्हणाले की, लायन्स क्लबने सामाजिक भाव जागृत करण्याचे काम करुन, वंचितांना आधार देण्याचे काम केले आहे. स्वत:पासून सामाजिक चळवळ उभी करुन शहरात सेवाभावाने एकत्र आलेल्यांची मोठी सामाजिक चळवळ उभी राहिली आहे. तर या चळवळीद्वारे शहराच्या विकासात योगदान देण्यासाठीही क्लबचे प्रयत्न सुरु आहे. लायन्सच्या माध्यमातून चौक सुशोभीकरण, गरजू मुलींचे लग्न लावणे (कन्यादान प्रकल्प), गरजू मुलींना शिक्षणासाठी मोफत सायकल उपलब्ध करुन देणे आदींसह आरोग्य, सामाजिक, पर्यावरणाच्या प्रश्‍नावर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या बैठकीत परदेशातून भारतात येणारे लायन्सचे युवक-युवतींच्या युथ एक्सचेंज प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या लिओ क्लब मधील युवक-युवती परदेशात पाठविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. सदस्यांनी विविध सामाजिक उपक्रमाच्या सूचना मांडल्या. मागील वर्षी राबविलेल्या उपक्रमाबद्दल चर्चा करुन भविष्यात राबविण्यात येणार्‍या उपक्रम निश्‍चित करण्यात आले.


तसेच क्लबच्या माध्यमातून सेवा देणारे डॉ. सिमरनकौर वधवा, डॉ. मानसी असनानी, डॉ. संजय असनानी, डॉ. अमित बडवे, डॉ. मिरा बडवे, डॉ. प्रिया मुनोत, डॉ. अनघा पारगावकर, इंजि. हरजितसिंह वधवा, इंजि. सुनिल छाजेड, इंजि. अभय मिस्त्री, प्रशांत मुनोत, जस्मितसिंह वधवा, अरविंद पारगावकर, ऋषीकेश सुकाळे, सीए किरण भंडारी, आनंद बोरा यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *