• Fri. Sep 19th, 2025

रविवारी सावेडीला रंगणार कालजयी सावरकर कार्यक्रम

ByMirror

Feb 24, 2023

गीतांच्या संगीतमय प्रवासातून उलगडणार सावरकरांच्या धगधगते देशभक्ती कार्य

नागरिकांना सहभागी होण्याचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर मित्र परिवाराचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि.26 फेब्रुवारी) सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक मध्ये संध्याकाळी 6 वाजता कालजयी सावरकर कार्यक्रम रंगणार आहे. मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर मित्र परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप व समर्थभक्त मंदारबुवा रामदासी गुरुजी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सावरकरांवर गीतांचा संगीतमय प्रवास रंगणार असून, सावरकर एक धगधगते अग्नीकुंड याचा उलगडा संगीतमय कार्यक्रमातून होणार आहे. हा संगीतमय कार्यक्रम संस्कार भारती पश्‍चिम प्रांत अहमदनगर समिती यांची प्रस्तुती आहे.


यावेळी पंढरपूर येथील ज्येष्ठविधीज्ञ तुकाराम चिंचणीकर यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन इंजि. केतन क्षीरसागर यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी समर्थ सत्संग परिवार, तेजस अतीतकर, मंगलारप स्क्रीन व सर्व मित्रपरिवाराचे विशेष सहकार्य लाभले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *