• Thu. Mar 13th, 2025 1:02:36 AM

मार्कंडेय विद्यालयात डिजिटल वर्गाचे उद्घाटन

ByMirror

May 3, 2023

तंत्रज्ञान व स्पर्धामय युगात विद्यार्थ्यांना अद्यावत डिजीटल शिक्षण काळाची गरज -शरद क्यादर

अहमदनगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञान व स्पर्धामय युगात विद्यार्थ्यांना अद्यावत डिजीटल शिक्षण काळाची गरज बनली आहे. प्रवाहात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून, या कार्यासाठी अनेक दानशूर व्यक्तीमत्वांची साथ लाभत असल्याची भावना पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर यांनी व्यक्त केली.


गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात व्यावसायिक भळगट यांच्या आर्थिक सहकार्याने साकारलेल्या डिजिटल वर्गाचे उद्घाटन शरद क्यादर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, सोने व्यावसायिक आनंद कोठारी, बांधकाम व्यवसायिक सचिन धांडे, उपध्याक्ष विलास पेद्राम, सचिव डॉ. रत्नाताई बल्लाळ, संस्थेचे विश्‍वस्त राजू म्याना आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


बाळकृष्ण सिद्दम म्हणाले की, संस्था व शाळा चालवितांना शासनाकडून कसल्याच प्रकारचे अनुदान नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कामगार वर्गातील विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. अश्या वेळी संस्था व शाळा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यास कटिबध्द आहेच. परंतु समाजातील दानशूर व्यक्तीनी शाळेस भरीव मदत केल्यास तळागळातील गरिब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही व त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


राजू म्याना म्हणाले की, मार्कंडेय शाळेत शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे कामगार वर्गातील असून, त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागते. संस्थेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्‍न सोडवून त्यांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. अनेक अडचणींचा सामना करुन संस्था कष्टकरी-कामगार वर्गातील मुलांचे भवितव्य घडविण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


डिजीटल वर्गाचे देणगीदार गणेश भळगट यांचा संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. आनंद कोठारी व सचिन धांडे यांनी शाळेसाठी मदत देण्याचे आश्‍वासन दिले. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक संदिप छिंदम यांनी प्रास्तविकात शाळेच्या गुणवत्तेची माहिती देऊन वर्षभर राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रा. डॉ. संतोष यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार पर्यवेक्षक प्रमोद चन्ना यांनी मानले. कार्यक्रमासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *