भगवान गौतम बुध्दांना अभिवादन
बुध्दांचे विचार यशस्वी व समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाला प्रेरणा देणारे -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त भिमनगर येथील बुध्द विहार मधील भगवान गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन गौतम बुध्दांच्या मुर्तीपुढे पुष्प वाहण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, मनोहर दरवडे, दीपक बडदे, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, अर्जुन बेरड, सुभाष होडगे, संपत बेरड, शिवम भंडारी, अशोक पराते, मतीन ठाकरे, प्रदीप जाधव, किशोर भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, प्रदीप भिंगारदिवे, जनाभाऊ भिंगारदिवे, बाळासाहेब राठोड, सदाशिव मांढरे, गौतम भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, भगवान बुध्दांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणी, संदेश आणि विचार मानवाला यशस्वी व समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाला प्रेरणा देत असल्याचे सांगितले.

संजय सपकाळ म्हणाले की, तथागत भगवान गौतम बुध्दांनी जीवनाचा खरा मार्ग दाखविला. त्यांनी माणवतेची शिकवण देऊन, समाजातील हिंसा, अशांती, अंधविश्वास आणि अधर्म दूर करण्याचे कार्य केले. भगवान बुध्द एक युग प्रवर्तक होते. त्यांनी संपूर्ण जगात आपल्या ज्ञानाची ज्योत पेटवली असल्याचे सांगितले.
प्रदीप जाधव म्हणाले की, भगवान बुध्द या महापुरुषांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेलाच झाला आहे. या महामानवाचे विचार व धम्म स्विकारुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात परिवर्तन घडविल्याचे सांगितले. संभाजी भिंगारदिवे यांनी ज्ञान आणि धर्माला भगवान गौतम बुध्दांनी एक नवीन दिशा दिली. त्यांनी लोकांना सत्याचा मार्ग आणि सोप्या मार्गाचा अवलंब करायला शिकवले. त्यांचे विचार आजही सर्व मानवजातील दिशादर्शक असल्याचे सांगितले.