स्वच्छता अभियान राबवून पिंपळाच्या झाडाची लागवड
भगवान गौतम बुध्दांनी मानवजातीला प्रकाशमार्ग दाखविला -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण जगाला दया, क्षमा व शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुध्द यांची जयंती म्हणजेच बुध्द पौर्णिमा भिंगार मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जॉगिंग पार्कमधील तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या भव्य पुतळ्यावर उपस्थितांनी फुलांचा वर्षाव करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. हरदिन मॉर्निंग ग्रुप, बौध्द ज्येष्ठ नागरिक संघ, माता रमाई महिला मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर जॉगिंग पार्कमध्ये स्वच्छता अभियान राबवून पिंपळाचे झाड लावण्यात आले.

प्रारंभी महिलांच्या हस्ते मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमातून भगवान गौतम बुध्दांच्या विचारांची तत्वे सांगून जीवनात धम्माचा स्विकार करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, बौध्द ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक दीपक अमृत, अध्यक्ष सोपान साळवे, माता रमाई महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. सिताताई भिंगारदिवे, शिवकुमार पांचारिया, सुभाष गोंधळे, जालिंदर बोरुडे, नामदेव जावळे, मेजर दिलीप ठोकळ, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, अशोक पराते, सुरेश कानडे, किशोर भगवाने, माजिद शेख, अभिजीत सपकाळ, मनोहर दरवडे, किशोर बोरा, संतोष लुणिया, विकास भिंगारदिवे, बापू तांबे, सरदारसिंग परदेशी, सुमेश केदारे, सिताराम परदेशी, विलास तोतरे, रामनाथ गर्जे, एकनाथ जगताप, मुन्ना वाघस्कर, अविनाश जाधव, रविंद्र कांबळे, सुनिल ओहाळ, उत्तम माळवे, सारिका बनसोडे, अंबिका घोडके, गाईबाई गायकवाड, आशाताई साळवे, साधना थोरात, अजय खंडागळे, विकास निमसे, अशोक लोंढे, सुंदरराव पाटील, अविनाश पोतदार, रतन मेहेत्रे, सदाशिव मांढरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
संजय सपकाळ म्हणाले की, करुणा व अहिंसेचे ज्ञान देऊन भगवान गौतम बुध्दांनी मानवजातीला प्रकाशमार्ग दाखविला. त्यांनी दिलेली नीतिसूत्रे अंगिकारल्यास खर्या क्षमा, शांती, त्याग, सेवा व समर्पण ही त्यांनी दिलेली शिकवण आदर्श जीवन जगण्यास प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
धम्म मित्र दिपक अमृत म्हणाले की, भगवान गौतम बुध्दांनी संपूर्ण मानवजातीला माणुसकीचा संदेश दिला. धम्म आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवित. भगवान बुध्दांनी दिलेली पंचशीलची शिकवण अमलात आणल्यास जीवनात परिवर्तन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर धम्माच्या तत्त्वज्ञानाची माहिती दिली.

यावेळी शिवकुमार पांचरिया यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. तसेच उपस्थितांनी जॉगिंग पार्कची स्वच्छता केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश जाधव, सुर्यकांत कटोरे, किरण फुलारी, राजू कांबळे, नितीन पाटोळे, कुमार धतुरे, जालिंदर अळकुटे, शेषराव पालवे, महेश सरोदे, अशोक भगवाने, तुषार धाडगे, योगेश चौधरी, सुनिल थोरात, भाऊसाहेब गुंजाळ, राजेंद्र शिंदे, राहुल भिंगारदिवे आदींनी परिश्रम घेतले.
