प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांच्या वाढदिवसाचा उपक्रम
गरजूंना थंडीनिमित्त ब्लँकेट व अरुणोदय गो शाळेस चारा वाटप, तर प्रतिष्ठाणच्या सदस्यांचे रक्तदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणने (ट्रस्ट) सामाजिक बांधिलकी जपली आहे. सर्व युवा सदस्य सामाजिक कार्यात योगदान देत असून, कोरोना काळातही प्रतिष्ठाणने गरजूंना आधार दिला. वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवित असताना गणेशोत्सव काळात घेतलेले उपक्रम वाखण्याजोगे असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणच्या (ट्रस्ट) माध्यमातून प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. चौपाटी कारंजा येथील दत्त मंदिर समोरील निराधार गरजूंना थंडीनिमित्त ब्लँकेट व अरुणोदय गो शाळेस चारा वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी माजी नगरसेवक निखील वारे, अजय औसरकर, विकी वाघ, मळू गाडळकर, संतोष ढाकणे, प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष किरण डफळ, कार्याध्यक्ष अजय दराडे, सुरेश म्याना, जगदीश चिलवर, गणेश जिंदम, संजय वल्लाकट्टी, नरेश चव्हाण, सचिन नराल, सोमनाथ लगडे, पप्पू टोणे, अमोल डफळ, महेश सब्बन, सुजित म्याना, हरिष बल्लाळ, प्रितेश डफळ, सतिश बल्लाळ, वरुण मिस्कीन, विकी मेहरा, बबलु राजपूत, किशोर लगडे, सुमित गोसके, प्रथमेश संभार, मयुर चिलवर, संकेत सुपेकर, ओम संभार, रोहित म्याना, प्रशांत धलपे, ओम संभार, रमेश औटी, स्वप्निल कोडम आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार म्हणाले की, बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणने शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली असून, प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली वाटचाल प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

दिलदारसिंग बीर यांनी प्रतिष्ठाणच्या माध्यमातून युवकांना संघटित करुन सामाजिक कार्य केले जात असल्याचे स्पष्ट करुन गणेशोत्सव काळात व वर्षभर राबविण्यात येत असलेल्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. तसेच बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाणच्या युवकांनी अर्पण ब्लड बँकेत उत्सफुर्तपणे रक्तदान केले. गो शाळेचे संचालक मनिष फुलडहाळे यांनी आभार मानले.
