बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मिळवले विविध विषयात 90 पेक्षा अधिक गुण
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सी.बी.एस.ई. बोर्डमध्ये इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यावर्षापासून शाळेत सुरु झालेल्या दहावीची बॅचने घवघवीत यश संपादन केले आहे.
पोदार इंटरनॅशनल स्कूल सी.बी.एस.ई. बोर्डाशी संलग्न असून, 1927 पासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्या संस्थेद्वारे चालवली जात आहे. शाळेमध्ये राबवले जाणारे नवनवीन शैक्षणिक व इतर उपक्रम तसेच शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर ही शाळा अगदी कमी कालावधीमध्ये सर्वांची पसंदीस उतरली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्फत फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय माध्यमिक शाळा परीक्षा (मुख्य) परीक्षेमध्ये बोर्डच्या 10 वी परीक्षेत सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
यंदा पहिल्यांदाच पोदार इंटरनॅशनल स्कूलची दहावीची बॅच सुरू झाली. त्यामुळे सर्व शिक्षक विद्यार्थी व शाळेचे प्राचार्य यांना निकालाची उत्सुकता होती. सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उंचावले आहे. शाळेतील विद्यार्थिनी तन्वी केदार रासने ही सर्व विषयात 95 व इंग्रजीमध्ये 96 गुण प्राप्त करून एकूण 95.2 टक्के मिळवून प्रथम आली आहे. तन्मय शीतल गुंदेचा याने एकूण 93 टक्के गुण, रुषिकेश बाळकृष्ण भापकर याने 92.8 टक्के, शिवम महेश देशमुख याने 92 टक्के, मोहम्मद अर्श परवेझखान सरकवास याने 91 टक्के, तेजस विनायक गुडेवार याने 91 टक्के व प्रांजल राजू सोनवणे हिने 89.6 टक्के गुण मिळून शाळेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. इंग्रजी विषयात एकूण 45 टक्के, हिंदी विषयात 55 टक्के, सामाजिक विज्ञान या विषयात 59 टक्के विद्याथी 90 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.
विविध विषयात टॉपर्स झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे-
इंग्रजी विषयात तन्वी रासने 96, ऋषिका बाफना 94, रुषिकेश भापकर 94, शिवम देशमुख 93, प्रांजल सोनवणे 92, तेजस गुडेवार 90, हिंदी विषयात तन्मय गुंदेचा 97, तन्वी रासने 95, शिवम देशमुख 95, मोहम्मद अर्श सरकवास 95, प्रांजल सोनवणे 95, संजोग कोतकर 95, दर्शन जगड 95, ऋषिका बाफना 95, सोहम खांडवे 95, रुषिकेश भापकर 94, अनिकेत भालसिंग 93, प्रणव घोडके 92, तेजस विनायक गुडेवार 91, गणित विषयात तन्वी रासने 95, तेजस गुडेवार 93, शिवम देशमुख 92, तन्मय गुंदेचा 90, विज्ञान विषयामध्ये तन्वी रासने 95, मोहम्मद अर्श सरकवास 95, तन्मय गुंदेचा 92, रुषिकेश भापकर 92, शिवम देशमुख 90, समाजशास्त्र विषयात तन्मय गुंदेचा 97, अनिकेत भालसिंग 97, रुषिकेश भापकर 96, तन्वी रासने 95, मोहम्मद अर्श सरकवास 95, सोहम खांडवे 95, शिवम देशमुख 93, तेजस गुडेवार 93, अथर्व चौधरी 93, संजोग कोतकर 93, दर्शन जगड 93, प्रताप लोटके 93, प्रांजल सोनवणे 92, प्रणव घोडके 91 प्राप्त करून उत्तीर्ण झाले.
शाळेतील सर्व विद्याथी हे 60 टक्केच्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या यशामागे शाळेचे हिंदी विषयाच्या शिक्षिका जयश्री कांबळे व शिक्षक नरेंद्र चौधरी, समाजशास्त्र विषयाचे शिक्षक सूर्यकांत बंगारी, इंग्रजीचे शिक्षक सुभाष गोळे, गणिताचे शिक्षक दिगंबर भोर, विज्ञान विषयाच्या शिक्षिका डायना सात्रळकर व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांनी अभिनंदन करुन शिक्षकांचे कौतुक केले. शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या घवघवीत यशाचे सर्व शिक्षक, शाळेचे प्रशासकीय अधिकारी आशुतोष नामदेव व सर्व पालकांनी कौतुक केले.