नगर तालुक्यातील 47 गावांना पाण्यासाठी एक रुपया सुद्धा द्यावा लागणार नसल्याचे नियोजन -खासदार सुजय विखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरणावर 5 कोटी रुपये खर्च करून प्रोटीन सोलर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बुर्हाणनगर योजनेतील 47 गावांना होणारा वीज बिलाचा त्रास कमी होऊन, पुढील पन्नास वर्षे नगर तालुक्यातील 47 गावांना पाण्यासाठी एक रुपया सुद्धा द्यावा लागणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले.
नगर तालुक्यातील नेप्ती येथे जलजीवन मिशन व रस्त्याची तब्बल 2 कोटी 78 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामाच्या उद्घाटनाप्रंसगी खासदार विखे बोलत होते. या कार्यक्रमासाठी उदयोजक सचिन कोतकर, मनोज कोकाटे, सरपंच सविता जपकर, उद्योजक संजय अशोक जपकर, माजी जि.प. सदस्य अरुण होळकर, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, वसंत पवार, माजी सरपंच विठ्ठल जपकर, सुधाकर कदम, उपसरपंच संजय जपकर, साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर, फारूक सय्यद, बाबासाहेब होळकर, बंडू जपकर, दादू चौगुले, संभाजी गडाख, एकनाथ जपकर, रामदास फुले, प्रा. एकनाथ होले, सिताराम जपकर, गोपीनाथ होले, मल्हारी कांडेकर, शिवनाथ होले, सौरभ जपकर, राहुल गवारे, अभिजीत जपकर, बाळासाहेब बेल्हेकर, ज्ञानेश्वर जपकर, बाळासाहेब गाडेकर आदी उपस्थित होते.
पुढे खासदार विखे म्हणाले की, ग्रामस्थांना आयुष्यभर मोफत पाणी देण्याचा मानस आंम्ही करत आहोत. या प्रकल्पाबाबत प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यात सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यात विकासाचे नियोजन करत आहोत. सत्ता नसल्यामुळे तीन वर्षे आपण कुठे जाऊ शकलो नाही. महाआघाडी सरकारने तीन वर्षाच्या काळात एक रुपयाचा निधी दिला नाही. सत्ता आल्यानंतर सर्वात जास्त निधी नगर तालुक्याच्या वाकोडी गावात आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून दिला आहे. पारनेर मतदारसंघात केलेले काम सहा महिने सुद्धा टिकलेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन वर्षे मध्ये झालेल्या कामची पाहणी करावी. आम्ही केलेल्या रस्त्याचे काम दर्जेदार झाले नाही तर ठेकेदार बदलून दुसरा ठेकेदार देऊ पण रस्त्याचे काम खराब करणार नाही. आंम्ही टक्केवारी घेऊन कधीच काम करत नाही, यामुळे आमचे रस्ते कधीच खराब होत नसल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

आघाडी सरकारच्या काळात दोन वर्षापूर्वी रस्त्याचे भूमिपूजन झालेले काम अद्यापही सुरू झालेले नाही. 1 कि.मी.चे नारळ फोडले ते काम सुद्धा रखडले आहे. आम्ही आठरा महिन्यात ऐंशी किमी चा नगर करमाळा रस्ता 70 टक्के पूर्ण केला आहे. नगर तालुक्यात भूसंपादनासाठी अकरा गावात शेतकर्यांना 240 कोटी रुपये तीन महिन्यात वाटप केले. त्यांच्या हक्काचा मोबदला दिला. नगर तालुक्यात पाच कोटी रुपयाचे महिला बालकल्याण भवन बांधणार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांना रोजगाराच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. त्यानी तयार केलेले पदार्थ बाजारात विक्रीसाठी मार्केटिंग सेंटरची उभारणी पुढच्या माहिन्या करणार आहोत. केंद्र सरकारच्या योजनेत शेतकर्यांना गाई घेण्यासाठी दोन गाईच्या पाठीमागे पन्नास हजार रुपये अनुदान पशुसंवर्धनच्या माध्यमातून देणार असल्याचे विखे यांनी सांगितले.
शिवाजी कर्डीले म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समिती ताब्यात आल्यावर मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार आहे. यासाठी आत्तापासून सर्वांनी सज्ज रहावे. राज्यात आपले सरकार असल्यामुळे निधीची कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच दिलीपराव होळकर, माजी चेअरमन दशरथ जपकर, पांडुरंग जपकर, मच्छिंद्र होळकर, बबन फुले, विलास जपकर, भास्कर जपकर, राजाराम जपकर, नाथा जपकर, रामराव कांडेकर, अरुण होले, शिवाजी गाडेकर, भानुदास फुले, दत्तात्रय कदम, विजय होळकर, सोमनाथ व्यवहारे, जमीर सय्यद, मुनीर सय्यद, अशोक जपकर, भरत कांडेकर, जावेद सय्यद, गुलाब सय्यद, भाऊ होळकर, पाराजी होळकर, रंगनाथ महांडुळे, गट विकास अधिकारी खरात, तहसीलदार उमेश पाटील, अभिजीत बारवकर, तालुका कृषि अधिकारी पोपटराव नवले, पाणी पुरवठा अधिकारी, अभियंता किसन कोपनर, ग्रामसेवक लालभाई शेख यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.