• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथे मंगळवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

ByMirror

Apr 17, 2023

बिरोबा मंदिराला रंगरंगोटी व विद्युतरोषणाईची सजावट

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.18 एप्रिल) गावात यात्रा उत्सव रंगणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.


नुकतेच गावातील युवकांनी गंगाजल आणण्यासाठी पारंपारिक वाद्यांसह मिरवणूकीने कावड घेऊन प्रवरा संगमकडे प्रस्थान केले. गावातील युवकांचा जथ्था कावडी घेवून मंगळवारी यात्रेच्या दिवशी सकाळी 8 वा. गावात परतणार असून, मोठ्या उत्साहात कावडीची गावामधून डफ, ढोल, ताशे व लेझीम पथकासह मिरवणूक काढली जाणार आहे.

सकाळी 10 वाजता श्रीबिरोबा महाराजांच्या मूर्तीस गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा केली जाणार आहे. सालाबाद प्रमाणे होणार्‍या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रात्री 9 वाजता छबीना मिरवणूक काढली जाणार आहे. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत आसमंत उजळून निघणार आहे.


यात्रेनिमित्त गावातील बिरोबा मंदिराला रंगरंगोटी करुन, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित राहून, विविध कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन देवाचे भगत नामदेव भुसारे, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, बाबा जाधव, अनशाबापू शिंदे, बाबा पुंड, बबन कापसे, रामदास वाखारे, पांडूरंग गुंजाळ, बशीर शेख, संजय डोंगरे, ठकाराम शिंदे, अंबादास निकम, मेजर शिवाजी पुंड, नवनाथ जाधव, रावसाहेब भुसारे आदीनी केले आहे. यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *