• Thu. Mar 13th, 2025

निमगाव वाघात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ByMirror

Apr 14, 2023

गावातील विविध ठिकाणी अभिवादन करुन, बाबासाहेबांचा जयघोष

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील नवनाथ विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय व आंबेडकर वस्तीत जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध ठिकाणी अभिवादन करुन, बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.


नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर सार्वजनिक ग्रामीण वाचनालय व एकता फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसह जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर आंबेडकर वस्तीत डॉ. बाबासाहेबांचा पुतळा स्टेजवर विराजमान करुन त्या भोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती.


गावात झालेल्या अभिवादन कार्यक्रमासाठी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक किसन वाबळे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, डॉ. विजय जाधव, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, अतुल फलके, किरण जाधव, शंकर गायकवाड, सचिन गायकवाड, निलेश आंग्रे, अरुण काळे, महिला पोलीस नाईक जयश्री फुंदे, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश जंबे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, दादा गायकवाड, दिपक गायकवाड, दिपक जाधव, संतोष रोहोकले, भानुदास ठोकळ, जयवंत केदार, नवनाथ फलके, सोमनाथ आतकर, संदीप गायकवाड, संदेश शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, वंचितांच्या उध्दारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करुन समाज परिवर्तनाचे महानायक ठरले. सामाजिक समतेसाठी विषमतेविरोधात तर न्यायासाठी अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला. शतकानुशतके वंचित असलेल्या समाजाला त्यांनी सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. आजही समाज जाती व विषमतेच्या बंधनात अडकला जात असताना या महामानवाचे विचार व कार्याने बदल घडून समाजाला दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *