• Wed. Mar 12th, 2025

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्याने वेड्याबाभळीने वेढलेल्या व पायवाट असलेल्या परिसराचा कायापालट

ByMirror

Apr 30, 2023

बोल्हेगाव येथील नवनाथ नगर व साळवे नगरच्या रस्ता कॉक्रीटीकरण व ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण

बोल्हेगाव उपनगराचा शहराच्या बरोबरीने विकास साधण्यासाठी विविध कामे मार्गी लावली -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव उपनगराचा शहराच्या बरोबरीने विकास साधण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली. या विकास कामासाठी नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला. ग्रामपंचायतमध्ये असलेला हा परिसर महापालिकेत वर्ग झाल्यानंतर अनेक वर्षाचा अनुशेष भरुन काढण्याचे काम करण्यात आल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.


बोल्हेगाव येथील नवनाथ नगर व साळवे नगर येथे झालेल्या रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण व ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक तथा माजी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे पाटील, नगरसेवक राजेश कातोरे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, दत्तू आप्पा वाकळे, मच्छिंद्र वाकळे, भानुदास धीवर, अरूण ससे, राजू आप्पा वाकळे, दादा रोहोकले, माजी सरपंच ज्ञानदेव कापडे, बच्चू काते, भालचंद्र पाटील, भाऊसाहेब गव्हाणे, एकनाथ साळवे, भिमा साळवे, साहेबराव पवार, नवनाथ भोर, वेजुनाथ ढोकणे, लक्ष्मण जगधने, बबन जगधने, भागचंद्र डुकळे, आकाश डाके, रघुनाथ साळवे, एकनाथ साळवे आदींसह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


पुढे आमदार जगताप म्हणाले की, प्रभागाचा बारकाईने अभ्यास करुन नगरसेवक वाकळे यांनी विकासात्मक कामे मार्गी लावली. महापालिकेत त्यांना स्थायी समितीच्या सभापती पदाची संस्थी मिळाल्याने त्यांनी या भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. विकासाचे व्हिजन असलेल्या नगरसेवकांकडून प्रभागात कामे मार्गी लावण्यात येतात, याच कामाचे मूल्यमापन करुन नागरिक निवडणुकांमध्ये त्यांच्या मागे उभे राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर विकासाला बळकटी देण्यासाठी कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या पाठीशी सदैव उभे रहाण्याचे त्यांनी आवाहन केले. विकास कामाला गती देणारा नगरसेवक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केल्याचे आमदार जगताप यांनी कौतुक केले.


प्रास्ताविकात माजी सरपंच ज्ञानदेव कापडे म्हणाले की, महापालिका झाल्यापासून हा रस्ता झालेला नव्हता. चिखलमय पायवाट असलेला अरूंद रस्त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वेड्याबाभळीने वेढलेले या परिसरात रस्ता, ड्रेनेजलाईन, पथदिवे आदी नागरी सुविधा उपलब्ध करुन नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी मोठा बदल केला असल्याचे सांगितले.


कुमारसिंह वाकळे म्हणाले की, पायवाटातून चिखल तुडवीत घरचा रस्ता गाठणार्‍या नागरिकांची कॉक्रीटीकरण रस्त्याने मोठी सोय झाली आहे. महापालिकेत स्थायी समिती व सभागृहनेते पदाची संधी आमदार जगताप यांच्या माध्यमातून मिळाली. या परिसराच्या विकासात्मक कामासाठी त्यांनी नेहमीच पाठबळ दिले व मोठा निधी उपलब्ध करुन दिला. धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्राला चालना देऊन विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन कार्य सुरु आहे. जाती- धर्मवादाच्या भानगडीत न पडता सर्वसामान्य अपेक्षित असलेला विकास याच मुद्द्यावर शहराला चालना देण्याचे काम आमदार जगताप करत असल्याचे त्यांनी सांगितले. तर लवकरात लवकर बोल्हेगाव गावठाण येथे महापालिकेच्या माध्यमातून दवाखाना सुरु करण्याचे स्पष्ट केले. नगरसेवक राजेंद्र कातोरे म्हणाले की, सर्वात जास्त विकास कामे आमदार संग्राम जगताप यांनी प्रभाग 7 मध्ये केली. दर्जेदार विकास कामे करून येथील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी कुमारसिंह वाकळे यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला. विकासाच्या दृष्टीने बोल्हेगाव उपनगर झपाट्याने पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.


स्थानिक नागरिकांनी देखील प्रभागातील विविध प्रश्‍नांची तात्काळ दखल घेऊन ते प्रश्‍न सोडविण्यात येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी सनी कदम, सचिन कदम, संभाजी शिरसाठ, रामभाऊ काते, विष्णु मोटे, बाळासाहेब धीवर, शिवा पवार, विठ्ठल गाडे, पप्पू रोहोकले, अशोक आठरे, प्रविण साटोटे, कृष्णा गोरखा, ताराचंद जगधने, सुखदेव साटोटे,भाउसाहेब भोर, पंकज लोखंडे, महादेव राउत, बबन मगर, रावसाहेब वाटमोडे, गंगाधर मुंगसे, संतोष वाटमोडे, नंदु वाकळे, नानासाहेब आढाव, नरेद्र मिसाळ, ऋषिकेश कराळे, भिवसेन कोलते, बाळासाहेब वाकळे, चेअरमन बाबासाहेब वाकळे, दशरथ वाकळे, सुदाम गावडे, रमेश वाकळे, रामचंद्र पाचारणे, साहेबराव पवार, हरीदास आरडे, बापू आरडे, निजाम सय्यद, रामा वाघमारे, गोवर्धन रोहोकले, अनिल डाके, भाऊसाहेब कापडे, निवृत्ती उंडे, अशोक पावले, हबीब शेख, जालिंदर कवडे, पंकज वाकळे, भाऊ पुंड, मल्हारी कदम, गणेश साळवे, योगेश थोरवे, सुरेंद्र हेंद्रे, रोहिदास जगधने, भिमा धोत्रे, आण्णा धोत्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज वाकळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *