तोंडाला काळे मास्क लावून ईडी व खोके सरकारच्या विरोधात घोषणा
विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विधिमंडळातील नेते जयंत पाटील यांच्यावर विधानसभा सभागृहात झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी (दि.23 डिसेंबर) नोंदविण्यात आला. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा निषेधार्थ आंदोलकांनी तोंडाला काळे मास्क लावून ईडी व खोके सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निलंबन मागे घ्यावे व विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, अशोक बाबर, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, वकिल सेलचे अॅड. योगेश नेमाणे, कामगार सेलचे गजेंद्र भांडवलकर,
विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, साधना बोरुडे, सुप्रिया काळे, सुनिता पाचारणे, शितल गाडे, शितल राऊत, शालिनी राठोड, उपाध्यक्ष अमोल कांडेकर, गणेश बोरुडे, निलेश इंगळे, लहू कराळे, युवक उपाध्यक्ष संतोष ढाकणे, शहानवाझ शेख, उमेश धोंडे, अर्जुन चव्हाण, मारुती पवार, वसीम शेख, अभिजीत सपकाळ, संपत बेरड, बाळासाहेब राठोड, भिंगार कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, जनाभाऊ भिंगारदिवे, शुभम बंब, सागर गुंजाळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ईडी सरकार करत आहे. विरोधी पक्षांवर एकप्रकारे अन्याय सुरू आहे. सत्ताधारी पक्षातील मंत्री व राज्यपाल महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्य करतात, याकडे दुर्लक्ष करुन सभागृहात मत व्यक्त करणार्या सभ्य व्यक्तींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार असून, सर्वांना बोलण्याची समान संधी असवी. मात्र सभागृहात सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबणे निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
