• Fri. Mar 6th, 2026

चर्मकार विकास संघाच्या वतीने दिव्यांग मुलीस आर्थिक मदत

ByMirror

Dec 13, 2022

दिव्यांगांना आधार देण्याची गरज -संजय खामकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी शेवगाव येथील अश्‍विनी सुनिल कुंढारे या दिव्यांग मुलीस 11 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. आर्थिक मदतीचा धनादेश व संत रविदास महाराज यांची प्रतिमा दिव्यांग मुलीचे वडील सुनिल कुंढारे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

यावेळी तालुका अध्यक्ष गोरख वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष संजय गुजर, वधुवर समिचीचे खजिनदार अरुण गाडेकर, उपाध्यक्ष गणेश पवार, युवा तालुका अध्यक्ष दिनेश तेलोरे, युवा नेते सोनल वाघमारे, संत राम पाचारणे, रमेश तरटे, सुमित तरटे, हिरालाल तरटे, बाळू रमंडवाल, किशोर रमंडवाल, हरिष रमंडवाल आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.


प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, दिव्यांग बांधव हे समाजातील एक घटक असून, त्यांना आधार देण्याची गरज आहे. यापुढे देखील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून भरीव मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.


संत रविदास महाराजांच्या विचाराने चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून खरडगाव येथील नन्नवरे कुटुंबांतील दिव्यांग मुलींना 50 लाखापेक्षा जास्त मदत मिळवून देण्यात आली होती. तसेच समाजात देहदान, अवयव दान, नेत्रदान, रक्तदान चळवळीत संघटना मोठे योगदान देत असून, महिला व समाजातील गरजू घटकांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेतले जात आहे. कोरोना काळातही चर्मकार विकास संघाने महाराष्ट्रातील 15 हजार कष्टकरी गटई बांधवांना जीवनावश्यक किराणा वस्तूचे वाटप केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *