अद्यावत ब्राइडल मेकअपने नटल्या युवती
हेअर स्टाईलचे प्रशिक्षण घेतलेल्या युवतींना प्रमाणपत्राचे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- सुंदर दिसण्यासाठी नटणे व मेकअप करणे ही या ग्लॅमरमय युगाची रितच बनली आहे. युवतींना मेकअप आर्ट्सचे अद्यावत धडे देऊन त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने रामचंद्र खुंट येथील गोल्डन सलून अॅण्ड ब्युटी पार्लरच्या वतीने शहरातील महिला आणि युवतींसाठी मोफत ब्राइडल मेकअप कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यशाळेत वधूसाठी असलेले अद्यावत तंत्रज्ञानयुक्त ब्राइडल मेकअपचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रसिध्द मेकअप आर्टिस्ट संकेत शिंदे व वसिम शेख (बल्ली) यांनी वधूची हेअर स्टाईल ते ब्राइडल मेकअपवर मार्गदर्शन केले. वधूचा पेहराव, ज्वेलरी त्या अनुषंगाने मेकअपद्वारे तिचे सौदंर्य खुलविण्याचा कलाविष्कार उपस्थितांनी प्रत्यक्ष अनुभवला. नटलेल्या वधूंना पाहून उपस्थितही अवाक झाले.

मेकअप आर्टिस्ट संकेत शिंदे म्हणाले की, ग्लॅमर व फॅशनच्या युगात मेकअप आर्टिस्टला महत्त्व निर्माण झाले आहे. समोरच्या व्यक्तीचे सौंदर्य खुलविण्याची काम मेकअप आर्टिस्ट करत असतो. महिलांसाठी मेकअप व पार्लरच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. वसिम शेख (बल्ली) यांनी युवतींनी मेकअप आर्ट्सचे परिपूर्ण ज्ञान आत्मसात करुन स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे सांगितले.
गोल्डन सलून अॅण्ड ब्युटी पार्लरचे संचालक जावेद अल्ताफ शेख (सिमला बिल्डर्स) म्हणाले की, गोल्डन अकॅडमी व पार्लरच्या माध्यमातून युवतींना सौंदर्य प्रशिक्षणाचे धडे प्रशिक्षण दिले जात आहे. युवतींना करिअरच्या दृष्टीकोनाने या क्षेत्रात उत्तम संधी असून, त्यांना तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन दिले जात आहे. तसेच सौंदर्य प्रशिक्षणाशी निगडीत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच हेअर स्टाईलचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवतींना उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण यावेळी करण्यात आले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी हेअर स्टायलिस्ट आसिफ शेख व अल्ताफ शेख यांनी परिश्रम घेतले.
