• Wed. Nov 5th, 2025

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी

ByMirror

Mar 22, 2023

वाहनांसाठी मोठी प्रतीक्षा, मात्र बुकिंग सुरुच

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी वाहन खरेदीला गर्दी दिसून आली. विजया दशमीच्या मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण केले.

केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये चारचाकी वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी केली होती. चारचाकी वाहनांसाठी ग्राहकांची मागणी अधिक असली तरी, वाहनांसाठी प्रतीक्षेत रहावे लागत आहे.


वासन टोयोटात दिवसभरात तब्बल 23 चारचाकी वाहनांचे ग्राहकांना वितरण करण्यात आले. गाडीची विधीवत पुजा करुन, दिवसभर वाहन वितरणाचा कार्यक्रम सुरु होता. आमदार अरुणकाका जगताप यांनी शोरुमला भेट देऊन नवीन वाहनांचे वितरण केले. यावेळी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, सहाय्यक व्यवस्थापक दिपक जोशी, टीम लीडर प्रविण जोशी आदी सेल्स टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते.


कार उत्पादन क्षेत्रात जगातील टॉप ब्रॅण्ड असलेल्या टोयोटा कंपनीत प्रवाश्यांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देऊन कारची निर्मिती करण्यात येते. क्वॉलिटी, ड्युरॅब्लिटी, रिलॅब्लिटी (क्युडीआर) या संकल्पनेवर आधारित निर्मिती केलेल्या व आकर्षक लूक, दणकटपणा व योग्य किंमत असलेल्या टोयॅटोच्या वाहनांकडे ग्राहकांचा कळ अधिक आहे. वाहनासाठी मोठी प्रतीक्षा यादी असली तरी ग्राहकांची बुकिंग सुरुच असल्याची माहिती शोरुमचे अनिश आहुजा यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *