केडगावातील बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे जयंतीपूर्वी होणार सुशोभीकरण -आ. संग्राम जगताप
नगरसेवक राहुल कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. केडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक राहुल कांबळे, गणेश ननावरे, सुरज शेळके, शहर अभियंता परिमल निकम, केडगाव विभाग प्रमुख सुखदेव गुंड, बौद्धाचार्य संजय कांबळे, अॅड. संतोष गायकवाड, कौशल गायकवाड, भूषण गुंड, सागर सातपुते, गणेश सातपुते, श्याम कोतकर, वैभव कदम, अण्णा शिंदे, महेश कांबळे, केतन कांबळे, संदीप पगारे, प्रतीक नरवडे, सागर पगारे, अभी शिरवाळे, लखन शिंदे, सचिन सरोदे, विशाल भिंगारदिवे, अरुण गायकवाड, करण पाचारणे, सनी पाचारणे, शशिकांत कांबळे, मंगेश कांबळे आदींसह केडगाव परिसरातील नागरिक व संदिप (दादा) कोतकर मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, केडगावमध्ये अनेक वर्षापासून असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे जयंतीपूर्वी केले जाणार आहे. या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी नगरसेवक राहुल कांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. दरवर्षी ते बाबासाहेबांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिन व संविधान दिनानिमित्त पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेऊन सामाजिक उपक्रम राबवित असतात. महापुरुषांचे पुतळे त्यांचे कार्य व चांगल्या विचारांची प्रेरणा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक राहुल कांबळे यांनी हजारो वर्षापासून विषमता आणि अंधारात असलेल्या वंचित समाजाला बाबासाहेबांनी जागृक करुन त्यांचा उध्दार केला. ज्याने आंबेडकरी विचार स्वीकारला तो मानसिक गुलामगिरीच्या जोकडातून मुक्त होतो. यासाठी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आंबेडकरी विचार दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
