संविधानावर आघात होत असताना, पुन्हा समता, स्वातंत्र्यता धोक्यात येण्याची शक्यता -धम्मचारी प्रशील
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 132 जयंती पर्वानिमित्त नुकतेच झालेल्या व्याख्यानातून महामानवाच्या कार्याचा जागर करुन त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. केडगाव येथील रेणुकामाता मंदिर समोर झालेल्या व्याख्यानात रत्नागिरी येथील व्याख्याते धम्मचारी प्रशील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरील राष्ट्र कार्य आपल्या भाषणातून मांडले.
धम्मचारी प्रशील म्हणाले की, संविधानावर आघात होत असताना, पुन्हा समता, स्वातंत्र्यता धोक्यात येण्याची शक्यता. यासाठी भारतीय म्हणून जागरुक होण्याची गरज आहे. राज्यघटना लिहिताना बाबासाहेबांनी सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवल्याने एक प्रगल्भ लोकशाही जगाला देणारी घटना भारतात अस्तित्वात आल्याचे त्यांनी सांगितले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरील राष्ट्र कार्याला त्यांनी उजाळा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास अभिवादन करुन व्याख्यानाला प्रारंभ झाले. बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक मनोज कोतकर, बच्चन कोतकर, अजित कोतकर, शुभम गायकवाड, अण्णासाहेब शिंदे, शाम कोतकर, नवनाथ कोतकर, भरत मतकर, राहुल कोतकर, राजन कदम, सामाजिक न्याय विभाग आणि आंबेडकरी चळवळीचे सुरेश बनसोडे, विशाल कांबळे, राहुल अल्हट, सुशांत म्हस्के, सुजित घगाळे, गौतमी भिंगार्दिवे, आरती बडेकर, कौशल गायकवाड, ओंकार कोतकर, राजन कदम, अशोक नरवडे, विकास साळवे, अविनाश कदम, सागर ठोंबे, कृष्णा काकडे, बाळू शिंदे, बाळासाहेब गमरे, बोर्या शिंदे, अपूल काळे, करन सुर्वे, रजनीकांत आढाव, सुदर्शन ठोंबे, संकेत निकाळजे, टेल्या सुर्वे आदींसह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या व्याख्यानाला केडगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शालेय विद्यार्थी देखील यावेळी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभयशील यांनी केले.