• Thu. Mar 13th, 2025

एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत केडगावच्या विकासात्मक परिस्थितीवर चर्चा

ByMirror

Mar 9, 2023

महाराष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रवादीचे मोठे योगदान -प्रा. माणिक विधाते

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रवादी पक्षाचे मोठे योगदान राहिले आहे. माजी केंद्रीय मंत्री ना. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरु असून, पुरोगामी महाराष्ट्राला विकासाची दिशा मिळाली. हा समाजकारणाचा वारसा प्रत्येक ग्रामीण भागात व शहरी भागात पक्षाचे लोकप्रतिनिधी, पुढारी व कार्यकर्ते पुढे घेऊन जात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केले.


एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत केडगाव येथील भैरवनाथ मंदिरात नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, ओबीसी सेलचे अमित खामकर, विशाल जाधव, सोनू घेंबूड, तुषार टाक, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, सरचिटणीस उमेश धोंडे, किरण कोतकर, तुषार कोतकर, रोहिदास कोतकर, लक्ष्मण करांडे, परबती ठुबे, सुधाकर कापरे, सुरेश गारुडकर, तुकाराम गारुडकर, रोकडे मामा, खोमणे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


पुढे प्रा. विधाते म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास पक्षाला बळ मिळणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी शहरासह केडगाव उपनगरात देखील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. विकासाचे व्हिजन घेऊन त्यांचे कार्य सुरु असून, केडगावमधील विविध प्रश्‍न त्यांच्या माध्यमातून सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांनी धर्म व जातीचे राजकारण न करता, विकास हाच राजकारण अजेंडा घेऊन सर्वसामान्यांना सुविधा देण्याचे काम केले. शहर हे विकासाच्या दृष्टिकोनाने मार्गक्रमण करीत असून, केडगाव उपनगराचा देखील चेहरा-मोहरा बदलण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण व समाजकारणात केडगावमध्ये सक्रीय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांशी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी मनमोकळेपणे संवाद साधला. आभार भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *