यंदाही मुलीच ठरल्या अव्वल, केडगाव ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.गिरीजा कुलकर्णी हिने 93 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात ज्ञानसाधना गुरुकुल क्लासच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. क्लासचा 100 टक्के निकाल लागला आहे.
प्रा. प्रसाद जमदाडे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी दिवस-रात्र एक करून मिळवलेले हे यश नक्कीच गावासाठी अभिमानास्पद आहे. या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा चालू ठेवली असून, ही परंपरा कायम राहणार असल्याचे सांगितले.
ज्ञानसाधना गुरुकुलचे विद्यार्थी जय तांबट (92 टक्के), प्रतीक जाधव (91.80 टक्के), ओम म्हस्के (90 टक्के), श्रावणी कुलकर्णी (89 टक्के), साहिल चव्हाण (88 टक्के), खुशी होणावळे (87.80 टक्के), सुरज पवार (86.20 टक्के), चैताली मतकर (85.40 टक्के), प्राजक्ता तारळकर (85 टक्के), ओंकार पोंदे (85 टक्के), प्रिया रासकर (84.80 टक्के), श्रावणी ढवळे (84 टक्के), ऋषीं मेहेत्रे (84 टक्के), मोहिनी जाधव (82 टक्के), प्रतिभा सावंत (82 टक्के), रेणुका मेहेत्रे (80 टक्के) यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे व केडगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.