विविध विषयांना मंजुरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर पोस्टल को-ऑपरेटिव्ह सोसायटीची 103 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.
सोसायटीचे अध्यक्ष निसार शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेसाठी व्हाईस चेअरमन रामेश्वर ढाकणे, कार्यकारी संचालक प्रफुल्ल काळे, अमित कोरडे, महेश तामटे, किशोर नेमाने, सलीम शेख, सुनील कुलकर्णी, शिवाजी कांबळे, स्वप्ना चिलवर, अर्चना दहिंदे, बळी जायभाय, अधिकारी वर्ग एन.बी. कांबळे, आर.ए. धस, पठारे, बाळासाहेब बनकर, संदीप हतगल, अमित देशमुख आदी उपस्थित होते.

निसार शेख म्हणाले की, 103 वर्षापासून पोस्टल को-ऑपरेटिव्ह सोसायटी सभासदांच्या हितासाठी योगदान देत आहे. सभासदांचे हित हेच ध्येय ठेऊन सोसायटीची वाटचाल सुरु असून, सभासद हिताचे निर्णय घेतले जात आहे. महाराष्ट्रात सोसायटीच्या अनेक शाखा असून, लावलेल्या रोपांचे वटवृक्ष बहरले असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिव प्रफुल्ल काळे यांनी विषय व इतिवृत्त वाचन केले. रामकृष्ण ढाकणे यांनी सभासदांना कमी व्याजदराने कर्ज वाटप करण्यात येत असून, सभासदांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या कार्यक्रमात संस्थेतील सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. मागील आर्थिक वर्षात सोसायटीला निव्वळ नफा 10 लाख 45 हजार 364 रुपये इतका झाला. जमा शेअर्सवर 7 टक्के डिव्हिडंट, कायम मुदत ठेवींवर 10.50 टक्के व्याज दिले जात आहे. कर्जाचा व्याजदर 9 टक्के व ठेवीचे व्याजदर 8.50 टक्के आहे. तसेच सभासदांच्या मुला-मुलींच्या विवाह निमित्ताने 5 हजार 555 रुपयांची विवाह भेट सोसायटीकडून दिले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी विजय चाबुकस्वार, मिलिंद भोंगले, सुनील भागवत, बलराम दाते, आनंद भांडवे, दत्तात्रय जासूद, भाऊसाहेब शिंदे, विजय कोल्हे, राजू गायकवाड, सचिन देवकाते, गणेश केसकर, धनंजय दैठणकर, इलियास शेख, शंकर कडभणे, जगदीश पेनलेवाड, महेश दांगट, अकील सय्यद, वेदशास्त्री वाकळे, आनंद कात्रजकर, आर.के. कुलकर्णी, दिलीप खरात आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कदम यांनी केले. आभार सतीश येवले यांनी मानले.