तर मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन व गो शाळेला चारा वाटप
विविध सामाजिक संघटनांचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन, गो शाळेला चारा वाटप व अनाथ मुलांच्या वस्तीगृहाला आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. प्रविणभाऊ भारस्कर यांच्या संकल्पनेतून रामजी आण्णा कबाडी मित्र मंडळ, प्रविणभाऊ भारस्कर मित्र मंडळ, वस्ताद ग्रुप, भारस्कर वाडी मित्र मंडळ, शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सरपंच प्रदिप काळे व सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या पुढाकाराने राबविलेल्या सामाजिक उपक्रमाप्रसंगी शेवगावाचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते ताहेरभाई पटेल, तुफेल मुल्लानी, अश्फाक पठाण, रावसाहेब भारस्कर, अप्पा भारस्कर, पोपट भारस्कर, अभी कबाडी, अशोक शिंदे, राजू निकाळजे, उचल फाउंडेशनचे सचिन खेडकर, माजी सभापती नितीन काकडे, भगवान मिसाळ आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी तळणीतील गोशाळेला चारा व बालसंस्कार शिबिरासाठी आलेल्या सर्व बालगोपाळांना खाऊचे वाटप करण्यात आले. पाथर्डी येथील मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. शेवगावला अनाथ मुलांचा सांभाळ करणार्या उचल फाउंडेशनला आर्थिक मदत देण्यात आली.
सरपंच प्रदिप काळे म्हणाले की, राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक भावनेने प्रविणभाऊ भारस्कर यांचे कार्य सुरु आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांचे कार्य सुरु असून, युवकांना संघटित करुन दिशा देण्याचे कार्य ते करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रविणभाऊ भारस्कर यांनी गरजूंना आधार देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील घटक असलेले मुकबधीर व निराधार विद्यार्थ्यांकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी कवी मिलिंद कांबळे, योहान रोकडे, प्रवीण भारस्कर, अशोक शिंदे, मिलिंद कुसळकर, साई पटेल, सन्नी क्षीरसागर, सोनू धनवडे, अब्बास कउसळकर, अक्षय सुमारे, अभी कबाडी, आकाश पवार, भैय्या लांडे, शुभम कबाडी, आदेश खंडागळे, प्रतीक ससाने पोषाण्णा कडमींचे, गणेश ससाणे,हर्षद भारस्कर, तुषार मोहिते, पोपट भारस्कर, रावसाहेब भारस्कर, संग्राम भारस्कर, सायली भारस्कर, रोहित प्रव्हाणे, अभिषेक बनकर, प्रतीक ससाणे, यश भारस्कर, सचिन आदमाने, सोपान मोहिते, पवन वैरागर, योहान रोकडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नजन सर यांनी केले.