पुरस्काराने काम करण्याची प्रेरणा मिळून जबाबदारी वाढते -पद्मश्री पोपट पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरस्काराने आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते व जबाबदारी वाढते. समाजातल्या वंचित, दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी गावपातळीवर संघटितपणे कार्य करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवात सावित्री ज्योती गौरव 2022 पुरस्कार वितरण प्रसंगी महाराष्ट्राचे आदर्श गाव ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पवार बोलत होते. गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रसिद्ध सिने चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, संजय गवारे, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. प्रशांत साळुंके, जय युवाच्या जयश्री शिंदे, संयोजक पोपटराव बनकर, डॉ. अमोल बागुल, मुख्य संयोजक अॅड. महेश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पद्मश्री पवार पुढे म्हणाले की, जय स्वयंसेवी संस्था जिल्ह्यातील संलग्न संस्थांना बरोबर घेऊन अतिशय उल्लेखनीय व प्रभावीपणे काम करीत आहेत. शासनाने या सामाजिक संस्थांना अर्थसहाय्य देऊन सहकार्य केले पाहिजे. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या त्यागी वृत्तीने विनम्रतेने कार्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी करण्याचे त्यांनी आवाहन केले.

या महोत्सवात मनीषा जगताप (श्रीगोंदा), शिवाजी सावंत (जुन्नर), सुनिता गायकवाड (नगर), इसाभाई शेख (पुणे), संगीता गुरव (बदलापूर, मुंबई), प्रा. रामलिंग सावळजकर (अकलुज,सोलापूर), मैनोद्दीन शेख (लातूर), सुहासराव सोनवणे (नगर), अनिता काळे (नगर), अॅड. जया उभे (पुणे), शोभा महाजन (कोल्हापूर), प्रमिला गावडे (राहुरी), रत्ना चांदगुडे (कोपरगाव), गिरीष बच्चाव (नाशिक), मंगल सासवडे (शिक्रापूर, पुणे), सागर चाबुकस्वार (भिंगार), सतीश पवार (पुणे), चंद्रकांत ख्याले (पुणे), राजकुमार आघाव (नगर), रजनी शेट्टी (भिंगार), सुनीता दौंड (पाथर्डी), वैशाली कुटे (पाथर्डी), जमुना पगारे (पाथर्डी), अलका मतकर (पाथर्डी), स्वाती भगवान चौरे (शेंडी), राजू सोनवणे (सोनई), ज्ञानदेव बेल्हेकर (राहुरी), ज्योत्सना शिंदे (नगर), सीमा शिंदे (राहता), विनायक निवसे (नगर), चंद्रकांत सोनवणे (पुणे), अनिल गंगावणे (कर्जत), हिराबाई गोरखे (श्रीगोंदा), संतोष शिंदे (श्रीगोंदा), नारायण साठे (राहुरी), बापूसाहेब गायकवाड (श्रीगोंदा), विजय नेटके (नगर), प्रतीक लोंढे (पुणे), शोभा निसळ (पुणे), वसंतराव सकट (श्रीगोंदा), मेजर भीमराव उल्हारे (श्रीगोंदा), अॅड. राजेंद्रकुमार देवकाते (कर्जत), राजीव मेहेत्रे (जामखेड), विठ्ठल कासले (कर्जत), विद्या तन्वर (नगर), रावसाहेब झावरे (पारनेर) यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव 2022 पुरस्काराने पद्मश्री पोपट पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सेमी पैठणी साडी, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र पुरस्काराचे स्वरुप होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अमोल बागुल व अनंत द्रविड यांनी केले. आभार पोपटराव बनकर यांनी मानले. महोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी दिनेश शिंदे, अमोल तांबडे, गायत्री गुंड, रुपाली गिरवले, अश्विनी वाघ, जयश्री शिंदे, आरती शिंदे, मीना म्हसे, निलेश रासकर, मीना वंजारे, स्वाती बनकर, सुदर्शन बनकर, शिवाजी नवले, भगवान चौरे, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गारडे, रावसाहेब मगर, बाळासाहेब पाटोळे, नयना बनकर, शाहीर कान्हू सुंबे, स्वाती डोमकावळे, शरद वाघमारे, शेखर होले आदींनी परिश्रम घेतले.