स्त्री शिक्षणाने सावित्रीबाईंनी अंधारलेला समाज प्रकाशमान केला -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महिला पदाधिकारी यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, साधना बोरुडे, संगीता लबडे, सुनिता पाचारणे, रेणुका पुंड, शितल गाडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, अमोल कांडेकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, अजय दिघे, मारुती पवार, गणेश बोरुडे, उमेश धोंडे, अभिजीत सपकाळ, निलेश इंगळे, अक्षय बोरुडे, मयुर भापकर, विशाल बेलपवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाची चळवळ चालवून त्यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुले केले. आज महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे याचे सर्वश्रेय फुले दांम्पत्यांना जाते. स्त्री शिक्षणाने सावित्रीबाईंनी अंधारलेला समाज प्रकाशमान केला. त्यांचे कार्य व विचार आजही समाजाला दीपस्तंभाप्रमाणे महिलांना प्रगतीचा मार्ग दाखवित असल्याचे त्यांनी सांगितले.