• Thu. Oct 16th, 2025

सागर चाबुकस्वार यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार

ByMirror

Oct 15, 2022

सामाजिक कार्याचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अ‍ॅकेडमीच्या वतीने पंचशील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर दत्तात्रय चाबुकस्वार यांना सपत्नीकराज्यस्तरीय सावित्री ज्योती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पद्मश्री पोपट पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सावित्री ज्योती महोत्सवात चाबुकस्वार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिने चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. प्रशांत साळुंके, उद्योजक संजय गवारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, राज्य आदर्श युवती पुरस्कार प्राप्त जयश्री शिंदे, मुख्य संयोजक अ‍ॅड. महेश शिंदे, पोपट बनकर आदी उपस्थित होते.


सागर चाबुकस्वार भिंगार शहरात सामाजिक संस्था व राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. भिंगार येथील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध शिबिर घेऊन त्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देत असतात. महापुरुषांच्या जयंती दिनी रक्तदान शिबीर, रुग्णांना फळ वाटप, गरजूंना अन्नदान आदी उपक्रम राबवित असतात. कोरोना काळात त्यांनी अनेक गरजूंना आधार दिला. दुर्बल घटकांना अन्न-धान्याची मदत पोहचवली. मागील वर्षी महाड, चिपळूण व कोकणात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरग्रस्तांना भिंगार शहरातून मदत पाठविण्यास पुढाकार घेतला. नागरदेवळे भागात ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करून नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू केले. भिंगार मधील अनेक ज्वलंत प्रश्‍न मांडून ते सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. अनेक गरजू विद्यार्थ्यांना ते सातत्याने शैक्षणिक मदत पुरवित असून, या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सावित्री ज्योती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यापुर्वी देखील त्यांना सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले असून, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे संतोष धिवर, बाळासाहेब भिंगारदिवे, कैलास वाघस्कर, चित्रकार किशोर भगवाने प्रल्हाद भिंगारदिवे, सुमित गोहेर, अच्युत गाडे, संदीप गजभिव, राजू कडूस, भिंगार शहर युवक काँग्रेस अध्यक्ष भुषण चव्हाण, शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोसिम शेख, ज्येष्ठ नेते सुनील शिंदे, संदीप गायकवाड, विनोद गायकवाड, नयन बोरूडे, श्रृजन भिंगारदिवे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *