अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील साई एंजल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी तनिष्क कमलेश भंडारी याने इयत्ता दहावी सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेत 95.2 टक्के गुण मिळवून शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मर्चंट बँकेचे संचालक कमलेश पोपटलाल भंडारी यांचा तो मुलगा आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका न्यानसी कौर, शिक्षक स्व. मनीष मालिक, केदार मुळे, आशिष तट्टू यांचे मोलाचे मार्गदर्शन तर डॉ. राकेश गांधी, सीबीएसईचे रिजनल ऑफिसर महेश धर्माधिकारी, स्वप्निल म्हेत्रे, डॉ. केसरकर यांचे सहकार्य लाभले. तनिष्क भंडारी याने मिळवलेल्या यशाबद्दल याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.