अध्यक्षपदी डॉ. सिमरनकौर वधवा, सचिवपदी प्रणिता भंडारी तर खजिनदारपदी प्रिया मुनोत यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची वर्ष 2022-23 ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षपदी डॉ. सिमरनकौर वधवा यांची तर सचिवपदी प्रणिता भंडारी, खजिनदारपदी प्रिया मुनोत व उपाध्यक्षापदी प्रिया बोरा यांची यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
लायन्स क्लब ही जागतिक दर्जाची असलेली सेवाभावी संस्था आहे. क्लबचे 210 देशामध्ये 15 लाख सभासदांच्या माध्यामातून सामाजिक कार्य चालू आहे. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने शहरात नेत्रदान, रक्तदान व वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन, समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आनण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. कोरोना काळात क्लबने घर घर लंगर सेवेच्या माध्यामातून मोठे कार्य केले आणि लाखो लोकांना जेवण पुरविले. दरवर्षा प्रमाणे जूनमध्ये नवीन कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून, क्लबच्या माध्यमातून सामाजिक उद्दीष्ट समोर ठेऊन वर्षभर कार्य केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. सिमरनकौर वधवा यांनी दिली.
नूतन अध्यक्षा वधवा फॅमिली फिजीशीयन डॉक्टर असून, त्यांनी सर्वसामान्यांसाठी, वयात येणार्या मुली व महिलांसाठी अनेक आरोग्य शिबीर घेतले आहेत. विविध सामाजिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. लायन्स क्लबच्या विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे. सचिव प्रणिता भंडारी या फायनान्शियल अॅडव्हायझर असून, त्यांनी डिप्लोमा इन कॉम्पुटर इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली आहे. त्या सकल राजस्थानी महिला मंच मध्ये सक्रीय आहेत. खजिनदार प्रिया मुनोत या होमिओपॅथिक डॉक्टर असून, त्यांचे ध्यान साधनेत प्राविण्य आहे. उपाध्यक्षा प्रिया बोरा या देखील लायन्सच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत आहेत. या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.