हजारो युवक कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी होणार -अमित काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची शिर्डी-साकुरी येथे रविवारी (दि. 28 मे) होणार्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे रिपाई युवक पदाधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील हजारो युवा कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यात आले.
या बैठकीसाठी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, आयटी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, नगर तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, नगर तालुका युवक उपाध्यक्ष अजय पाखरे, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, भिंगार युवक शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, कर्जत तालुका युवक उपाध्यक्ष लखन भैलुमे, युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, पाथर्डी युवक तालुकाध्यक्ष महेश अंगारखे, अमोल साठे, पारनेर युवक तालुकाध्यक्ष आदेश गायकवाड, श्रीगोंदा युवक शहराध्यक्ष चेतन ससाणे, युवक तालुकाध्यक्ष जॉन घोडके, शेवगाव युवक तालुकाध्यक्ष भाऊ वाघमारे, शोन भिंगारदिवे, अब्दुल सय्यद, अमोल लोंढे, अभिषेक थोरात, तुषार भिंगारदिवे, विशाल उबाळे, तुषार बाचाटे, शाहुल भिंगारदिवे, आनंद नाटक, प्रतीक सुर्यवंशी, गौरव पवार, प्रतीक केदारे आदी उपस्थित होते. ही बैठक जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, पारनेर तालुकाध्यक्ष राजु उबाळे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा आंबेडकरी चळवळ व रिपाईचा बालेकिल्ला आहे. मोठ्या संख्येने बहुजन समाज पक्षाला जोडला गेला आहे. तळागाळातील शोषित व दुर्बल घटकांचे प्रश्न आरपीआयच्या माध्यमातून सोडविले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआयची वाटचाल सुरु आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटका पर्यंत घेऊन जाण्याचे कार्य आरपीआयचे कार्यकर्ते करीत आहे. आरपीआय हा एका समाजापुरता मर्यादीत नसून, सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे जात आहे. सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांचा समावेश असलेल्या बावीस आघाड्या पक्षात कार्यरत असून, या अधिवेशनाच्या माध्यमातून रिपाईची राज्यातील शक्ती एकवटणार असल्याचे सांगितले.

या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, यांच्यासह प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राष्ट्रीय सचिव अविनाश महातेकर, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, राज्य सचिव दिपक गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत पाटील, विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी युवक पदाधिकार्यांवर विविध जबाबदार्या सोपविण्यात आल्या.